शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
2
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
3
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
4
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
5
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
6
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
7
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
8
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
9
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
10
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
11
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
12
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
15
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
16
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
17
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
18
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
19
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
20
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

लग्न कर नाहीतर पळवून नेईल! नकार दिल्याने तरुणीला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 4:02 PM

लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणीला पळवून नेण्याची धमकी देण्यात आली. तथा तिला मारहाण करून विनयभंगही करण्यात आला. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

अमरावती : तरुणीने लग्नास नकार दिल्याने तिला मारहाण करून पळवून नेण्याची धमकी देण्यात आली. इतकेच नव्हे तर तिचा विनयभंगही करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी सलमानखान उस्मानखान (२५) व राजा (३२, दोन्ही रा. अन्सारनगर, अमरावती) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.  फिर्यादी व आरोपी एकमेकांचे नातलग आहेत. सलमान खान व त्याच्या आईने मुलीस लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तो दारू पीत असल्याने तरुणीने लग्नास नकार दिला. दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी सलमान खान व त्याचा जावई तरुणीच्या गावात पोहोचले. जावई घराबाहेर उभा राहिला, तर आरोपी घरात शिरला व त्याने तरुणीला मारहाण मारहाण केली. तरुणी घाबरलेल्या अवस्थेत ओरडतच घराबाहेर पळाली. तेव्हा घराबाहेर असलेल्या जावयासह आरोपीने लग्न कर, अन्यथा पळवून नेईल, अशी धमकी दिली.

दरम्यान, पीडितेची आई व भाऊ घरी पोहोचल्याने दोघेही पळून गेले. या घटनेप्रकरणी १३ नोव्हेंबर रोजी पहाटे वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी