शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वयंम’पासून हजारो आदिवासी विद्यार्थी वंचित; संकेतस्थळ ‘जैसे थे’

By गणेश वासनिक | Updated: December 10, 2023 19:31 IST

शासनाने वयाची अट ३० वर्षे केली; पण आयुक्तालयातून सुधारणाच नाही.

गणेश वासनिक, अमरावती : आदिवासी विकास आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती असल्यामुळे शासकीय वसतिगृहात प्रवेशापासून वंचित असलेल्या अनुसूचित जमातीच्या हजारोे विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेपासून मुकावे लागले आहे. शासनाने या याेजनेसाठी वयाची अट २८ ऐवजी ३० वर्षे केली तरिही ‘ट्रायबल’च्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी विद्यार्थी सैरभैर झाले आहेत.

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीनंतरच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या; परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या एकूण २० हजार संख्येच्या मर्यादित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तर व मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये देय असलेली रक्कम थेट जमा करण्याबाबत ' पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना सुरू करण्यात आली आहे.अशी आहे खर्चाची तरतूद

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई ,ठाणे ,पुणे ,पिंपरी-चिंचवड, नागपूर याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी वार्षिक खर्च ६० हजार रुपये, तर महसुली विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च ५१ हजार रुपये दिले जाते.शासन निर्णय निर्गमित करुन सात महिने झाले. वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही म्हणून विद्यार्थी रूम करुन भाड्याने राहतात. भोजनासाठी मेस लावतात. शैक्षणिक साहित्याचा खर्च करतात. आता विद्यार्थी स्वयं योजनेसाठी अर्ज करीत आहेत तर अपात्र दाखवितात. शासन निर्णयानुसार तत्काळ संगणकीय प्रणालीमध्ये बदल करुन विद्यार्थ्यांना स्वयं योजनेची संधी उपलब्ध करुन द्यावी. - ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम.

टॅग्स :Educationशिक्षण