शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कौशल्य शिक्षणाचा जागर! 'पीएम स्कील रन'मध्ये धावले अमरावतीच्या अंबानगरीचे हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी

By गणेश वासनिक | Updated: September 17, 2023 13:42 IST

प्रशिक थेटे व सलोनी लव्हाळे यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

गणेश वासनिक / अमरावती: कौशल्य शिक्षणाचा प्रचार-प्रसार व शासनाच्या नवीनतम तंत्रशिक्षण योजनांची माहिती युवकांना व्हावी, यासाठी आयोजित ‘पीएम स्कील रन’ मॅराथॉन दौडमध्ये हजारोंच्या संख्येनी आयटीआय विद्यार्थी-विद्यार्थींनींनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेत दौड पूर्ण केली. या उत्साही क्रीडामय प्रसंगाने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले.

या रनमध्ये विद्यार्थ्यांमधून प्रशिक थेटे प्रथम, गौरव खोडतकर द्वितीय, ललीत गावंडे तृतीय क्रमांक पटकाविला. तर विद्यार्थींनीमधून सलोनी लव्हाळे, मनवा पाबळे, समिक्षा आमझरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्यात. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपयांची पारितोषिके वितरीत करण्यात आलीत. यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डिजीटल प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

रविवारी, सकाळी ७ वाजता शासकीय आयटीआयच्या परिसरातून ‘पीएम स्कील रन’ मॅराथॉन दौडला शुभारंभ झाला. अमरावती विभागाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅराथॉनला मार्गस्थ केले. या मॅराथॉनमध्ये जिल्ह्यातील शासकीय व खासगी आयटीआय संस्थेचे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. शासकीय आयटीआय परिसर-पंचवटी चौक- विभागीय आयुक्त कार्यालय रोड-गर्व्हनमेंट गर्ल्स हायस्कुल-आयटीआय अशी पाच किलोमीटरची मॅराथॉन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी धावून पूर्ण केली.

या कार्यक्रमाला उपसंचालक एस. के. बोरकर, सहायक संचालक आर. एम. लोखंडे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी डॉ. आर. ई. शेळके, उप प्राचार्य आर.जी. चुलेट, एस. एन. बोराडे, अधीक्षक एम. आर. गुढे, विद्याभारती आयटीआयचे प्राचार्य जी.बी. तवर, दहीकर, शिल्प निदेशक रवींद्र दांडगे, निरीक्षक नेमाडे  अस्पाबंडचे रणजीत बंड, एसबीआयचे मॅनेजर इमराना अंसारी, अभिजीत वैद्य आदींनी सक्रीय सहभाग नोंदविला.

टॅग्स :Amravatiअमरावती