शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

मला बदनाम करण्यासाठी, मी भाजप सोडणार असे पिल्लू बाहेर काढले; प्रवीण पोटेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 12:39 IST

माझी राजकीय वाटचालही भाजपतून सुरू झाली आणि मी भाजपतच असेल, असा दावा आमदार पोटे यांनी केला.

ठळक मुद्देहे तर मला बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र, प्रवीण पोटेंचा आरोप

अमरावती : हल्ली देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष हा भाजप आहे. या पक्षानेच मला मंत्री, आमदार केले. त्यामुळे भाजप सोडण्याचा विचारही मनात येत नाही. मी भाजप सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे वृत्त निराधार असून, मला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप विधान परिषदेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेतून केला.

आमदार प्रवीण पोटे यांच्या माहितीनुसार, येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे. यात जिल्हा व महानगरात भाजप सत्तेत येणार हे निश्चित आहे. त्यामुळे आतापासून काहींनी बदनाम करण्यासाठी मी भाजप सोडणार, असे पिल्लू बाहेर काढले आहे. माझी राजकीय वाटचालही भाजपतून सुरू झाली आणि मी भाजपतच असेल, असा दावा आमदार पोटे यांनी केला.

हिंदुत्व विचारसरणी अंगीकारली आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांना सुद्धा माझ्यावर तितकाच विश्वास आहे. त्यामुळे मी भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार हे वृत्त निराधार, कपोलकल्पित असल्याचे आमदार पोटे यांनी सांगितले. अधिवेशन काळात भाजपच्या सर्व कार्यक्रम, आंदोलनात सहभागी झालो. मध्यंतरी भाजपच्या आंदोलनात सहभागी होतो. गुन्हे देखील दाखल झाले.

सध्या देश, राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असताना अमरावतीत नख लावण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप आमदार प्रवीण पोटे यांनी केला. राजकीय दृष्ट्या बदनाम करण्यासाठी वृत्त प्रकाशित करून भाजपला काहीही फरक पडत नाही, असा टोलाही आमदार प्रवीण पोटे यांनी लगावला.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, डॉ. नितीन धांडे, तुषार भारतीय, जयंत डेहनकर, रवींद्र खांडेकर, सुनील काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणPravin Poteप्रवीण पोटेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmravatiअमरावती