शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ते थांब.. थांब म्हणून ओरडत राहिले अन् चोरटा डोळ्यादेखत कार घेऊन पळाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 15:48 IST

घराबाहेर उभे आपले वाहन कुणीतरी चोरून नेत असल्याचे लक्षात येताच बापलेकांनी जोरजोरात आरडाओरड केली. मात्र, तो चोर ती कार घेऊन रफुचक्कर झाला.

ठळक मुद्देएमआयडीसीतील घटनादुचाकीसोबत चारचाकी वाहनेही लक्ष्य

अमरावती : रात्री घरातील सर्व मंडळी बसून गप्पागोष्टी करत होते. इतक्यात त्यांना कार स्टार्ट करण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर जाऊन बघितले तर, कुणीतरी त्यांची कार चोरून नेताना दिसला. ते जोर-जोरात थांब-थांब म्हणून गाडीच्या मागे धावत सुटले अन् चोरटा सुसाट गाडी पळवत रफूचक्कर झाला.

फ्रेजरपुरा हद्दीतील राजपुरोहित नगरातून शासकीय चारचाकी वाहन पळविल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा वाहनधारकाच्या डोळ्यांदेखत चारचाकी वाहन पळवून नेण्यात आली. ही थरारक घटना ६ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास एमआयडीसी भागात घडली. चोरांनी दुचाकीसोबतच आता चारचाकी वाहनांना लक्ष्य केले आहे.

एमआयडीसीतील रितेश नरेश वर्मा (४०) हे ६ डिसेंबर रोजी रात्री कुटुंबीयांसोबत गुजगोष्टी करत होते. त्यांनी आपली एमएच ०२ केए १४४० ही कार घराच्या आवारात ठेवली होती. रितेश हे घरी असताना रात्री ११.३० च्या सुमारास त्यांना आवारातील कार चालू करण्याचा आवाज आला. त्या आवाजामुळे रितेश व त्यांचे वडील नरेश वर्मा हे दार उघडून घराबाहेर आले. त्यांना धक्काच बसला. त्यांची महागडी कार कुणीतरी चालू करून चोरून नेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दोघांनीही त्या कारच्या दिशेने थांबा, थांबा अशी ओरड केली. मात्र, ती आरडाओरड कानावर न घेता तो अज्ञात चोर त्यांची कार घेऊन पळाला. काही कळण्याच्या आतच ही घटना घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी दुपारी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशाली काळे यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली.

सलग दुसऱ्या दिवशी घटनाप्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयाचे एमएच २७ एए ००८१ हे चारचाकी वाहन राजपुरोहितनगर भागातून ६ डिसेंबर रोजी पहाटे १.३० च्या सुमारास पळविण्यात आले होते. त्यावेळीदेखील कारचालकाला आवाज आल्याने त्याने आरडाओरड केली. मात्र, तो चोर थांबला नाही. त्यामुळे वाहनचालक मेश्राम यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली होती. ते शासकीय वाहन ६ डिसेेंबर रोजी सकाळच्या सुमारास रेवसा शिवारात बेवारस स्थितीत आढळले होते. सलग दुसऱ्या दिवशी कार चोरीची घटना घडली आहे. केवळ बदलले ते पोलीस ठाणेच.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcarकारtheftचोरी