शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चोरासारखे आले अन् गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:54 IST

पालकमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी चोरासारखे येऊन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन केले व चोरासारखे निघून गेले, असा थेट प्रहार आ. रवी राणा यांनी बडनेरा येथे केला. विविध विकासकामांच्या सोहळ्याच्या मंचावरून शुक्रवारी आ. राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ यांना लक्ष्य केले.

ठळक मुद्देभूमिपूजनाचा वाद पुन्हा पेटला : रवी राणांचा पालकमंत्र्यांवर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : पालकमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी चोरासारखे येऊन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन केले व चोरासारखे निघून गेले, असा थेट प्रहार आ. रवी राणा यांनी बडनेरा येथे केला. विविध विकासकामांच्या सोहळ्याच्या मंचावरून शुक्रवारी आ. राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ यांना लक्ष्य केले.युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने बडनेऱ्यातील जयस्तंभ चौकात आ. रवि राणा यांच्याद्वारे सात कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नवनीत राणा यांनीही उपस्थितांना संबोधित केले. सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन पार पडले. त्याला उपस्थित राहिलेल्या शेकडो नागरिकांपुढे आ. राणा यांनी अपेक्षेनुरूप राजकीय फटकेबाजी केली. यावेळी नगरसेविका सुमती ढोके, आशिष गावंडे, अयूबभाई, कांचन ग्रेसपुंजे, मजिद कुरेशी, निळकंठराव कात्रे, अजय मोरय्या, संजय हिंगासपुरे उपस्थित होते.मिलची जागा तरी पाहिली का?प्रवीण पोटे हे उद्योग राज्यमंत्री आहेत; त्यांनी विजय मिलची जागा तरी पाहिली का? या जागेचा सातबारा माझ्या नावे दाखवून द्या; माझी पत्नी नवनीत राणा खासदारकीची निवडणूक लढणार नाही, असे थेट आव्हान आ. राणा यांनी दिले.अडसूळ बिनकामाचे खासदारआनंदराव अडसूळ हे बिनकामाचे खासदार आहेत. अमरावतीशी त्यांना काही घेणे-देणे नाही. मोदींची सभा झाली म्हणून ते निवडून आले. ‘अडसूळ मजबुरी है, मोदी जरूरी है’ असे म्हणत मतदारांनी त्यांना खासदार केले, असे आ. राणा म्हणाले.दुसऱ्यांदा भूमिपूजन?नव्या वस्तीतील काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन २ डिसेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याचेच दुसºयांदा भूमिपूजन करून आ. रवि राणा हे नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपजनांकडून होत आहे. तथापि, यासंदर्भात भाजप शहर अध्यक्ष जयंत डेहनकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाPravin Poteप्रवीण पोटे