लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जयस्तंभ ते अचलपूर तहसील कार्यालयापर्यंतच्या ३.८ किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात या कामावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. १६ कोटींचे हे काम तीन टप्प्यांत पूर्णत्वास जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले आहेत.रस्त्याची रूंदी १८ मीटर राहणार आहे. रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजक घेऊन त्यावर पथदिवे लावून परिसर विकसित केला जाणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच या १८ मीटर रूंदीच्या रस्त्याचे सीमांकन व रेखांकन निश्चित केले आहे. या १८ मीटरमध्ये जयस्तंभ, लाकूड बाजार, रेल्वे स्टेशन परिसरात येणारे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. पाच कोटींच्या पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ते काम जी.पी.अग्रवाल या एजंसीला देण्यात आले आहे. यात जयस्तंभ ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंतचे काम केले जाणार आहे. यामुळे अतिक्रमणाची समस्या सुटणार आहे. दुसऱ्या व तिसºया टप्प्यांतील ११ कोटी रूपयांच्या निविदा प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. अचलपूर - परतवाडा शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. बाजार समिती-बसस्थानक-जयस्तंभप्रमाणे दुभाजक, पथदिवे लागणार असल्याने रस्त्यावर लखलखता प्रकाश मिळणार आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित होता. आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.
जयस्तंभ ते अचलपूर रस्त्याचे होणार चौपदरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:01 IST
रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजक घेऊन त्यावर पथदिवे लावून परिसर विकसित केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच या १८ मीटर रूंदीच्या रस्त्याचे सीमांकन व रेखांकन निश्चित केले आहे. या १८ मीटरमध्ये जयस्तंभ, लाकूड बाजार, रेल्वे स्टेशन परिसरात येणारे अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
जयस्तंभ ते अचलपूर रस्त्याचे होणार चौपदरीकरण
ठळक मुद्दे१६ कोटीच्या कामाचे तीन टप्पे : बच्चू कडू यांचे प्रयत्न