शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

यूजीसीने काही दिवसांपूर्वी परीक्षांच्या नियोजनाबाबत समिती गठित केली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यूजीसीच्या गाइड लाइननुसार महाविद्यालयीन परीक्षांबाबत सांघिक निर्णय घेतला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना दिलासा : यूजीसीची गाईडलाईन, नियोजन १ ते ३१ जुलै दरम्यान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या उन्हाळी परीक्षांचे नियोजन संबंधित विद्यापीठांना करावे लागणार आहे. १ ते ३१ जुलै या काळात परीक्षा घेण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.यूजीसीने काही दिवसांपूर्वी परीक्षांच्या नियोजनाबाबत समिती गठित केली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यूजीसीच्या गाइड लाइननुसार महाविद्यालयीन परीक्षांबाबत सांघिक निर्णय घेतला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. अंतिम सत्राव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश दिला जाणार आहे. अगोदरचा परफॉर्मन्स बघून विद्यार्थ्यांना ५०-५० फॉर्म्युलानुसार ग्रेडेशन दिले जाईल. यात काही विद्यार्थी कमी गुण वा नापास झाल्यास त्यांच्या इच्छेनुसार विद्यापीठांना परीक्षा घ्यावा लागतील. एटीकेटीनुसार नवीन सत्रात प्रवेश देण्यात येणार आहे. १२० दिवसांत परीक्षा घ्यावा लागतील. लॉकडाऊन काळातील ४५ दिवसांच्या उपस्थितीबाबत महाविद्यालयांना सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. उन्हाळी सुटी जाहीर करण्याचे अधिकार विद्यापीठांना बहाल केले आहेत. १८ ते २३ जुलै दरम्यान सीईटी घेण्याबाबत निर्णय होणार आहे.अंतिम वर्षातील ६० ते ७० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करावे लागेल. जुलै महिन्यात परीक्षा घेण्याबाबत निर्णय झाला असून, लॉकडाऊनची स्थिती बघून जून महिन्यात बैठक घेण्याचे संकेत आहे. अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा होणारच, हे आता स्पष्ट झाले आहे.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन व्हावे१ ते ३१ जुलै या कालावधीत अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा घेताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर गर्दी होणार नाही. परीक्षा हॉलचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा प्रसंगानुसार घेता आल्यात तरच घ्याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय समुपदेशन केंद्रउन्हाळी परीक्षांच्या अनुषंगाने विद्यार्थी, पालकांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशन केंद्रे असतील. त्यामध्ये परीक्षा, कोरोना विषाणूविषयी माहिती, विद्यार्र्थ्यांच्या मनातील भीती काऊन्सलरच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाuniversityविद्यापीठ