शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

फरदळ घेणे भोवणार बोंडअळी उद्रेक होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:05 IST

Amravati : कपाशीची पूर्वहंगामी लागवडही ठरणार घातक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या खरिपात मार्चपर्यंत काही शेतकऱ्यांनी घेतलेला कपाशीचा खोडवा व कृषी विभागाने १६ मे पासून बीटी बियाणे विक्रीला दिलेली परवानगी यामुळे कपाशीची पूर्वहंगामी लागवड होणार आहे. यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नसल्याने यंदाच्या खरिपात बोंडअळीचा धोका कित्येक पटीने वाढला आहे.

दरवर्षी ३१ मेपर्यंत बियाणे विक्रीस प्रतिबंध होता. यंदा मात्र १६ मेपासून बियाणे विक्रीची मुभा दिलेली आहे. अशा परिस्थितीत हंगामपूर्व कपाशीची लागवड झाल्यास बोंडअळीचे नियंत्रण कसे करणार, यासाठी जबाबदार कोण ? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यापूर्वी सन २०१७ हंगामात गुलाबी बोंडअळीचा उद्रेक झाला होता. त्यानंतर सातत्याने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. यापूर्वी बीटी बियाणांची ३१ मेपर्यंत विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. यंदा मात्र १६ मेपासून बीटी बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यास यंदादेखील प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. हंगामपूर्व कपाशीची लागवड झाल्यास बोंडअळीच्या जीवनक्रमाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

कंपन्यांच्या दबावात निर्णय, शेतकऱ्यांचा आरोप●  दरवर्षी १ जूननंतर तर यंदा मात्र १६ मेपासून बियाणे विक्री खुली करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, त्यांच्याद्वारा हंगामपूर्व बीटी कपाशीची लागवड झाल्यास पुन्हा बोंडअळीचे संकट ओढवणार आहे.

●  या दिवसात नांगरणी व कडक उन्हानंतर बोंडअळीचे पतंग नष्ट होण्याची शक्यता असते; मात्र १५ दिवस पूर्व बियाणे विक्री खुली केल्याचा निर्णय बियाणे कंपन्यांच्या दबावात घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

●  गतवर्षीच्या खरीप हंगामातील कपाशीचा खोडवा यंदा मार्चपर्यंत घेण्यात आला. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्याऐवजी तिला खाद्य मिळाल्याने यंदा बोंडअळीच्या उद्रेकाची शक्यता आहे.

उशिराच पेराबोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगामपूर्व पेरणी टाळावी.

यंदा १६ मेपासून बियाणे विक्री होणार असल्याने ड्रीपवर काही शेतकरी हंगामपूर्व कपाशी लागवड करतील. शिवाय काही शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कपाशीचा खोडवा घेतला, त्यामुळे यंदाच्या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.- पवन देशमुख, कृषितज्ज्ञ 

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र