अमरावती : जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान व सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये मतदान प्रक्रियेतील ११ हजार कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १३२ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळलेत. कोरोना संसर्ग काळातील मतदान प्रक्रियेत थेट हजारो कर्मचाऱ्यांशी संपर्क आल्यानंतर कर्मचारी घरी जाताना पुन्हा चाचणी करणे महत्त्वाचे असताना निवडणूक विभागाने त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे काहींचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. यामध्ये अधिकारी व कर्मचारी असे एकूण १० हजार मनुष्यबळाचा वापर या निवडणूक प्रक्रियेत झाला. याशिवाय साडेतीन हजारांवर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचाही या प्रक्रियेत समावेश होता. यामध्ये थेट मतदारांशी संबंध येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली. यामध्ये १३ हजार ७५४ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनाची चाचणी केली. यामध्ये १३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहे.
मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर हे सर्व जण १५ तारखेला रात्री घरी जाणार आहे. तत्पूर्वी या सर्वांची कोरोना चाचणी निवडणूक विभागाने करणे महत्त्वाचे असताना चाचणीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाचणीविनाच हे कर्मचारी परिवारात परतले आहे. एखाद्या कोरोनाबाधितांशी मतदान प्रक्रियेत त्यांचा संबंध आला असल्यास त्याचा संसर्ग अनेकांना होऊ शकतो. त्यामुळे या संशयित कर्मचाऱ्यांनी आता गृह विलगीकरणात राहावे काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
पाॅइंटर
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती : ५३७
निवडणुकीसाठी एकूण कर्मचारी : ११,०००
प्रक्रियेपूर्वी झालेल्या चाचण्या : १३,१६४
कोट
मतदान प्रक्रियेपूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी अशा सूचना देण्यात आल्यात. त्यानुसार टेस्ट केली; परंतु मतदानानंतर घरी परतत असताना चाचणीबाबत कुठल्याच सूचना नाहीत.
सुनील ठाकरे, कर्मचारी
कोट
निवडणूक प्रशिक्षणाच्या दिवशी चाचणी केली. ती निगेटिव्ह आली. त्यामुळे पथकात गेलो. मतदान आटोपल्यानंतर कोरोना चाचणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सूचना नाहीत.
प्रमोद देशमुख, कर्मचारी
कोट
मतदान प्रक्रियेमध्ये कुठलीही लक्षणे नसताना कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आली. नागरिकांशी संपर्क आल्यामुळे चाचणी आवश्यक होती. घरी लहान मुले आहेत. लक्षणे मात्र कुठलीच नाही.
प्रभाकर चौधरी, कर्मचारी