शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

राज्यात शिष्यवृत्तीचा गुंता सुटेना, ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय, संकेतस्थळावर माहिती नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:45 IST

राज्यात शिष्यवृत्ती महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर काहीतरी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एससी वगळता ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा गुंता कायम आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : राज्यात शिष्यवृत्ती महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर काहीतरी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एससी वगळता ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा गुंता कायम आहे. केंद्र सरकारने अद्यापही ओबीसींच्या शिष्यवृत्तीचे सन २०१७-२०१८ यावर्षीेचे ५०० कोटींचे अनुदान अप्राप्त आहे. मार्च महिना संपायला उणेपुरे महिना शिल्लक असून, गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रातील लाखो विद्यार्थी अजूनही शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीबाबत अचूक माहिती नाही.राज्य शासनाने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी आजतागायत २ हजार ४४४ कोटींचे अनुदान वितरित केले आहे. त्यानुसार एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत १२०७ कोटी शिष्यवृत्तीवर खर्च झाले. अजूनही १,२३७ कोटी शिल्लक असून ते मार्च महिन्यांत खरेच वाटप होतील काय, यावरून समाजकल्याण विभागाचा गोंधळ दिसून येते. प्रामुख्याने एससी संवर्गासाठी ७२५ कोटी ६८ लाखांचे अनुदान दिले असून, २४५ कोटी १९ लाखांचे अनुदान शिल्लक आहे. तसेच ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १७१८ कोटी मिळाले असून ८२८ कोटी शिष्यवृत्तीवर खर्च झाले. परंतु, केंद्र सरकारने सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षांसाठी ओबीसी विद्यार्थ्यांकरिता केवळ ६४ कोटींचे अनुदान दिले आहेत. विद्यार्थी संख्येनुसार गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५०० कोटींचे अनुदान  अपेक्षित आहे. केंद्र सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सन २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षांत ५१० कोटींचे अनुदान पाठविले होते, ही आकडेवारी शासन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र, सन २०१६-२०१७ व २०१७-२०१८ या दोन वर्षांत ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारने अक्षरश: पाठ फिरवल्याचे दिसून येते. गतवर्षी एससी संवर्गातील ४ लाख ६० हजार ६६५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी, तर ५४ हजार ८७१ इतके विद्यार्थी फ्रिशीपकरिता पात्र ठरले. सर्व संवर्गातून १६ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ताीसाठी अर्ज भरले. सन २०१७-२०१८ शैक्षणिक वर्षांत १ लाख ९० हजार प्रथम वर्षाला प्रवेशीत विद्यार्थी वगळता नियमित एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन स्कॉलरशीप वेबसाईटवर नोंदणी केली. शिष्यवृत्तीचे १४० कोटी ४० लाखांचे अनुदान वाटप झाले. यात २८ हजार विद्यार्थी एससी संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती व शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क इत्यादी मिळून १४० कोटी ४० लाख अनुदान वाटप झाले आहे. सन २०१६-२०१७ च्या पात्र विद्यार्थी संख्या १६ लाख ८४ हजारांपैकी सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटनुसार १२ लाख ३० हजार ६२७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेत; परंतु ४ लाख ५० हजार विद्यार्थ्यांचे मॅन्युअली देयके काढली. आयुक्त, समाजकल्याण यांच्या पत्रानुसार १३४ कोटींचा खर्च दर्शविला गेला. विशेषत: ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी वेबसाईट अद्यापही सुरु झालेली नाही.   अशी मिळाली केंद्र सरकारकडून ओबीसी शिष्यवृत्तीसन २०१४- २०१५    - ५९१ कोटीसन २०१५-२०१६    - ५६६ कोटीसन २०१६-२०१७    - ७७.९७ कोटी सन- २०१७-२०१८    - ६४ कोटी चार वर्षांतील शिष्यवृत्ती खर्चाची आकडेवारी (कोटीत)वर्ष        विद्यार्थी संख्या    खर्च २०१४-२०१५    १६, ०७, ८९४    २९१९२०१५-२०१६    १४, ५५, ४९३    २५८४ २०१६-२०१७    १३,४२. ६३९        २९१७२०१७-२०१८    ६, ६५, ८८५        १२०७

टॅग्स :educationशैक्षणिक