शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

संप नव्हे आत्मसन्मानाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:25 IST

कुणीही यावे अन् कुणालाही मारून जावे, अशी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थिती झालेली आहे. यामुळे आमची सुरक्षिताता धोक्यात आली असून सनदशीर मार्ग असताना अनेक उपटसुंभाची मजल अधिकाऱ्यांच्या कॉलरपर्यंत जाते, ही अत्यंत खेदजनक बाब असून पुकारलेला संप नव्हे, तर ही आमची आत्मसन्मानाची लढाई असल्याची भूमिका घेत महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी कामकाज बंद ठेवले. हे कामबंद आंदोलन २ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे.

ठळक मुद्देमहापालिका कर्मचाऱ्यांचा संप : दुसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुणीही यावे अन् कुणालाही मारून जावे, अशी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थिती झालेली आहे. यामुळे आमची सुरक्षिताता धोक्यात आली असून सनदशीर मार्ग असताना अनेक उपटसुंभाची मजल अधिकाऱ्यांच्या कॉलरपर्यंत जाते, ही अत्यंत खेदजनक बाब असून पुकारलेला संप नव्हे, तर ही आमची आत्मसन्मानाची लढाई असल्याची भूमिका घेत महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी कामकाज बंद ठेवले. हे कामबंद आंदोलन २ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीदिनी हारार्पण करूनच आपण कामाला हात लावू, असा ठाम पवित्रा या अधिकारी, कर्मचाºयांनी घेतला आहे.मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय गव्हाळे यांनी सहायक आयुक्त प्रशांत शेळके यांची कॉलर पकडून आयुक्त संगय निपाणे यांच्या दालनात अर्वाच्य शिवीगाळ केली. व अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना धक्काबुक्की व मारहाण केली. महापालिका कार्यालय व नरसिंग सरस्वती नगरात शुक्रवारी हा प्रकार घडला होता. या घटनेचा निषेध म्हणून महापालिकेतील १६०० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाºयांनी संप पुकारला. दरम्यान आयुक्त संजय निपाणे यांनी अधिनिस्थ यंत्रणेशी चर्चा करून बंद मागे घेण्याची सूचना केली होती. मात्र, संप नव्हे, ही तर आत्मसन्मानाची लढाई असल्याचे सांगत संपात सहभागी झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची सूचना नाकारली. शनिवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी राजकमल चौकस्थित मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात एकत्र आले. यात उपायुक्तांसह मुख्यलेखा परीक्षक, वैदयकीय आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता, अधीक्षक, शिक्षणाधिकारी, एडीटीपी, अधीक्षक, कनिष्ठ तथा वरिष्ठ लिपिक, शिपाई, स्वच्छता कामगार आदी संपात सहभागी झाले.महापौरांना निवेदनवारंवार होणारे भ्याड हल्ले, अश्लील शिवीगाळ यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले असून, मानसिक संतुलन बिघडले आहे. महापालिकेत काम करण्याची मनस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदन शनिवारी महापौर संजय नरवणे यांना देण्यात आले. निवेदनाची प्रत पालकमंत्री, नगरविकास राज्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त व अन्य संबंधित यंत्रणेला पाठविण्यात येणार आहे.