शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २६ जागांवर आरटीओचे अधिकारी नाहीत!

By गणेश वासनिक | Updated: May 11, 2024 23:09 IST

नागपूर व अमरावती या दोन्ही विभागाची एकाच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे जबाबदारी, रिक्त पदांकडे शासनाचे दुर्लक्ष.

अमरावती : राज्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २६ जागांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच चार ठिकाणी आरटीओ अधिकारीच नाही, येथे रामभरोसे कारभार सुरू असल्याचे विदारक चित्र प्रादेशिक परिवहन विभागात निर्माण झाले आहे.

राज्य शासनाला महसूल देणारा विभाग म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाची ख्याती आहे; मात्र ‘की पोस्ट’वर अधिकारी नियुक्त नसल्याने अतिरिक्त कार्यभारावर आरटीओ कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. अमरावती व नागपूर या दोन्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची जबाबदारी रामभाऊ गीते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यातील आरटीओशी संबंधित कामकाज हाताळताना गीते यांना मोठी कसरत करावी लागते. राज्य शासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये मोटार वाहन निरीक्षक, वाहन निरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत; परंतु ३० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आल्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत आरटीओच्या नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. पदोन्नती रखडली, कामे वाढलीप्रादेशिक परिवहन विभागात आरटीओ, डेप्युटी आरटीओ, एआरटीओ या श्रेणीत पदोन्नती रखडली आहे. त्यामुळे पदोन्नतीशिवायवरिष्ठ पदांची जबाबदारी हाताळावी लागत आहे. यात बहुतांश मोटार वाहन निरीक्षक, वाहन निरीक्षकांना सुद्धा पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. मनुष्यबळाची वानवा ही मोठी समस्या आहे. आरटीओत नवीन आकृतीबंध लागूराज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात नवीन आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. यात जुने ४०० पदे खारीज करून नव्यानेकाही पदांना अपग्रेड करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविताना ७० टक्के कर्मचाऱ्यांंची पदे अपग्रेड झालीआहेत; मात्र आजही आरटीओ, डेप्युटी आरटीओ, एआरटीओ या पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नतीची आस आहे. या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे आहे अतिरिक्त कार्यभारजितेंद्र पाटील (मुंबई), दिनकर मनवर( मुंबई), संदेश चव्हाण (मुंबई), प्रकाश जाधव (मुंबई), अशोक पवार (मुंबई पश्चिम), विनय अहिरे (मुंबई पूर्व), अभय देशपांडे (पनवेल), दीपक पाटील (कोल्हापूर), प्रदीप शिंदे (नाशिक), स्टीव्हन अल्वारीस(धुळे), संजय मेत्रेवार (संभाजीनगर), रामभाऊ गीते (नागपूर), गजानन नेरपगार (लातूर), विनोद साळवी (कल्याण),नंदकिशोर काळे (सिंधुदुर्ग), अर्चना गायकवाड (सोलापूर), राजेंद्र केसकर (बारामती), उर्मिला पवार (श्रीरामपूर), विनाेद सगरे(सांगली), ज्ञानेश्वर हिरडे (यवतमाळ), हर्षल डाके (नागपूर शहर), मोहम्मद समीर (वर्धा), स्वप्निल माने (बीड), अनंता जोशी (हिंगोली), प्रकाश जाधव (मुंबई) या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. तसेच मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई मध्य, ठाणे आणि पुणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपद निरंक असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस