शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

- तर अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:32 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत २७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अद्याप १३ महाविद्यालयांनी मूल्यांकनाकरिता विषय प्राध्यापकांना पाठविले नाही. त्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, अशी ताकिद विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकी पेपरच्या मूल्यांकनास प्राध्यापकांना पाठविण्याची सक्ती

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत २७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अद्याप १३ महाविद्यालयांनी मूल्यांकनाकरिता विषय प्राध्यापकांना पाठविले नाही. त्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, अशी ताकिद विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने दिली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात यासंदर्भात विद्यापीठ कोणती भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.उन्हाळी आणि बॅकलॉग असे अभियांत्रिकीचे दोन लाख पेपरचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी विद्यापीठाकडे आहे. १५ मे पासून मूल्यांकनास प्रारंभ झाले असले तरी महाविद्यालयातून मूल्यांकनासाठी विषय प्राध्यापकांना पाठविण्याची तसदी प्राचार्यांकडून घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी आल्या असताना त्या व्हॅल्युअरअभावी तशाच पडून आहेत. विषय प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केल्याशिवाय पुढील प्रवास करता येत नाही. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने ज्या १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शून्य मूल्यांकन आहे, अशा महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका परीक्षा विभागात स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी कठोर भूमिका घेतली आहे. परिणामी विद्यापीठविरूद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘मूल्यांकन नाही तर उत्तरपत्रिका नाही’ असा आक्रमक पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.

अभियांत्रिकी बॅकलॉगचा निकाल १० दिवसात लागणारअभियांत्रिकी बॅकलॉग पेपरचे मास्कींग पूर्ण झाले असून, पुढील १० दिवसांत निकाल जाहीर केले जातील, अशी तयारी करण्यात आली आहे. ५० पेपरचे निकाल तयार झाले. अभियांत्रिकी बॅकलॉग विषयाचे पेपर झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत निकाल जाहीर केले जाणार आहे.१३ अभियांत्रिकी महाविद्यालयांना तंबीमूल्यांकनासाठी विषय प्राध्यापकांना न पाठविणारे १३ अभियांत्रिकी महाविद्यालये अमरावती विद्यापीठाच्या रडारवर आहेत. यात धामणगाव रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथील भोसला, मानव आणि शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज अभियांत्रिकी, चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा येथील राजश्री शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील डॉ. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, खामगाव येथील सिद्धी विनायक अभियांत्रिकी, पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथील जगदंबा अभियांत्रिकी, वाशिम येथील संमती अभियांत्रिकी आणि अमरावती येथील पी.आर. पोटे आर्किटेक्चर अभियांत्रिकीचा समावेश आहे.

शून्य मूल्यांकन असलेल्या १३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मौखिक ताकिद दिली आहे. दोन दिवसांत विषय प्राध्यापकांना मूल्यांकनाकरिता पाठविले नाही तर अशा महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, असे कळविले आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र