अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील गोरोबानगर स्थित आदर्श कॉलनी येथील घरबांधणीच्या ठिकाणावरून ९ हजार ७०० रुपये किमतीचे साहित्य एका इसमाने चोरून नेल्याची घटना १५ जून रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी संजय माणिकराव पंचपात्रे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.
------------------------------------------------------
लोखंडी सुरी घेऊन महिलेस धमकावले
अमरावती : व्याजाचे पैसे दे, नाही तर घरातील साहित्य घेऊन जाईल, असे म्हणून लोखंडी सुरीने एका महिलेस धमकाविल्याची घटना १५ जून रोजी घडली. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी संजय कोचे (रा. मांडवा झोपडपट्टी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
------------------------------------------------------------
स्पोर्ट सायकल चोरी
अमरावती: गाडगेनगर ठाणे हद्दीतील मधुबन कॉलनीतून १७ हजार रुपये किंमतीची स्पोर्ट सायकल अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना १३ जून रोजी घडली. याप्रकरणी आशिष यादवराव चुटके (४५) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.