शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घरात चोरी, दानपेटीही पळवली, अखेर चोराच्या हाती पडली बेडी; दोन गुन्ह्यांची दिली कबुली

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 5, 2023 18:02 IST

कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती : खापर्डे बगिचा परिसरात दोन नागरिकांच्या घरातून रोख रक्कम व मोबाइल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला कोतवाली पोलिसांनी मंगळवारला अटक केली. त्याच्याकडून ३,९३० रुपये जप्त करण्यात आले.

दिनेश वासुदेव भारसाकळे (४६) (रा. निंभी चिनका, अकोला) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. खापर्डे बगिचा येथे राहणारे युवराज प्रकाश राठोड (३०) यांच्या उघड्या घरातून चार हजार रुपये रोख लंपास करण्यात आले होते. त्याचप्रमाणे याच परिसरात राहणारे चंदन केशवराव भारती (४०) यांच्या घरातून दोन मोबाइल व मंदिरातील दानपेटी असा २८ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

तपासात सदर गुन्ह्यांत दिनेश सहभागी असल्याचे समोर आल्यावर त्याला अटक करून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सदर दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून ३ हजार ९३० रुपये रोख जप्त करण्यात आले. ही कारवाई कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश सपकाळ, दीपक श्रीवास, शिरीष सावरकर, प्रकाश मिसाळ, सतीश खंडारे, मंगेश दिघेकर, मोहम्मद समीर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटकAmravatiअमरावती