शहरातून चार दुचाकींची चोरी, पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:45+5:302020-12-03T04:23:45+5:30

अमरावती : शहरात रोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे नागरिक दुचाकी चोरांमुळे ...

Theft of four bikes from the city, neglected by the police | शहरातून चार दुचाकींची चोरी, पोलिसांचे दुर्लक्ष

शहरातून चार दुचाकींची चोरी, पोलिसांचे दुर्लक्ष

Next

अमरावती : शहरात रोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे नागरिक दुचाकी चोरांमुळे हैराण झाले असताना पुन्हा शहर हद्दीतून चारदुचाकी चोरीला गेल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ८५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी अज्ञाताने लंपास केल्याची माहिती पुढे आली आहे.

बडनेरा ठाणे हद्दीतून कुलकर्णी वाडीतून ४० हजार रुपये किमतीची एमएच २७ यू ८११५ क्रमांकाची दुचाकी मंगळवारी चोरीला गेली. फिर्यादी संदीप भाऊराव भवाळ (२८, रेलनगर दुर्गापूर) यांनी तक्रार नोंदविली. गाडगेनगर हद्दीतील रामपुरी कॅम्प साईमंदिराजवळून ३० हजार रुपये किमतीची एमएच २७ सी क्यू २२८४ क्रमांकाची दुचाकी मंगळवारी चोरीला गेली. फिर्यादी विक्की प्रकाशलाल नावानी (२७, रा. रामपुरी कॅम्प) यांनी तक्रार नोंदविली. सिटी कोतवाली ठाणे हद्दीतील खापर्डे बगीच्या येथून ५ हजार रुपये किमतीची एमएच २७ एजे २४४२ ही दुचाकी २८ नोव्हेंबर रोजी चोरीला गेली. याप्रकरणी मंगळवारी गुन्हा नोंदविला. फिर्यादी एका महिलेने पोलिसात तक्रार नोंदविली. राजापेठ ठाणे हद्दीतील डी मार्टच्या बाजूला असलेल्या घराजवळून १८ हजार रुपये किमतीची एमएच २८ एक्स ४४८८ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी फिर्यादी अक्षय गजानन वडतकर (२७ रा. कडोशी ता. बाळापुर जि. अकोला) यांनी तक्रार नोंदविली.

Web Title: Theft of four bikes from the city, neglected by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.