शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याच हाताने मरणार म्हणत, तरूणाला चाकूने भोसकले; गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: December 10, 2022 17:39 IST

हल्ल्यात तरूणाची बहीणही गंभीर जखमी; बेनोडा येथील घटना

अमरावती : ‘तू आमच्याच हाताने मरणार’ असे म्हणत एका २५ वर्षीय तरूणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. यात हल्ल्यात त्या तरूणाची बाहिण देखील जखमी झाली. ९ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास बेनोडा येथील पंचशिल झेंड्याजवळ ही घटना घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी चौघांविरूद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. रोहीत उर्फ नादो विजय भोंगळे (२५) व सोनू विजय भोंगळे (दोघेही रा. बेनोडा) अशी जखमी बहीण भावाची नावे आहेत. जुन्या वैमनस्यातून आपल्या मुलांवर चार आरोपींनी प्राणघातक हल्ला चढविल्याची तक्रार नादोच्या आईने पोलिसांत नोंदविली.

शुक्रवारी रात्री रोहीत उर्फ नादो हा घराच्या अंगणात असताना प्रवीण बन्सोड, रूपेश बन्सोड आणि अनिल जोंधळे तसेच एक अनोळखी इसम असे चार जण त्याच्या घरात चाकु घेऊन शिरले. येताना चौघांनी, नादो, आता तुला सोडणार नाही, तू आमच्या हाताने मरणार’ असे म्हणून जोरजोराने शिवीगाळ करत व हातातील चाकू फिरवत येत असताना आजुबाजूचे लोक भितीने आपापले घरात पळून गेले. त्यावेळी अंगणात असलेल्या चौघांनी मिळून नादोवर चाकूने वार केलेत. नादोला भोसकत असल्याने त्याची आई व बहीण सोनू मध्ये गेल्या. मात्र हल्लेखोरांवर त्याचा परिणाम झाला नाही. त्यांनी नादोच्या मुलाला पाठीवर, डोक्यावर, पोटावर चाकूने वार करून त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. तर, प्रविण बन्सोड आणि रूपेश बन्सोड यांनी सोनुच्या हातावर, पोटावर आणि पाठीवर चाकूने वार करून तिला देखील जखमी केले.

म्हणून पळाले हल्लेखोर

घटनेवेळी शेजारी राहणाऱ्या ती महिला मदतीकरीता धावल्याने चारही हल्लेखोर पळून गेले. नादो याला जिल्हा सामान्य रुग्णालय व पुढे एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर, अश्विनी उर्फ सोनू हिच्यावर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण उर्फ पिंटू भीमराव बनसोड (३९), रूपेश भीमराव बनसोड (४२, दोघेही रा. बेनोडा जहांगिर), अमोल जोंधळे (३८, रा. भीमटेकडी) व सै. नाजिल सै. सत्तार (३२, राहुलनगर) यांच्याविरूध्द १० डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती