शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

मेळघाटात पाणी पेटले, विहिरींना बूड लागले; जलस्रोत आटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:20 IST

Amravati : टँकर सुरु, जलजीवनच्या योजना काही गावांमध्ये फेल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असताना मात्र मेळघाटात पाणी पेटल्याचे भीषण वास्तव आहे. जलजीवन मिशन योजना गावागावांत राबविली असली तरी अभियंत्यांच्या ढिसाळ कारभारामुळे ही योजना फेल झाली आहे. परिणामी दरवर्षीप्रमाणे यंदाही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

शासनाकडून पाणीपुरवठा करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्याअनुषंगाने मेळघाटातील गावांमध्ये जलकुंभ बांधले. नळ घरापर्यंत पोहोचविले. मात्र नळाद्वारे पाणी घरापर्यंत गेले नाही. त्यामुळे मेळघाटात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल रस्त्यालगतच्या गावांमध्ये पाण्याची ओरड आहे. काही गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना राबविल्या. मात्र, स्त्रोत आटले असून, काही ठिकाणी मोटार जळाल्याची समस्या पुढे आली आहे. विहिरींना बूड लागले. वीज देयके अदा करण्यात आली नाहीत. अशा एक ना अनेक समस्या पाणीपुरवठ्याशी निगडित निर्माण झाल्या आहेत. गावातील विहिरींना बूड लागल्याने दोन ते तीन किमी अंतरावरून आदिवासी गावे, पाड्यातील महिलांना पायपीट करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना मेळघाटातील जलसंकटावर दुर्लक्ष केले जात आहे.

या गावांमध्ये जलसंकटमेळघाटातील ढाकणा, बुटीदा, चुनखडी, खडीमल, माखला, आकी, चवऱ्यामल, हतरू, रायपूर या आदिवासी गावांमध्ये जलसंकट असल्याची माहिती आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून तलाव साकारण्यात असले तरी अनेक तलाव आटले आहेत. तसेच २० लाखांच्या निधीतून एक विहीर निर्माण झाली असली तर बहुतांश विहिरींना बूड लागले आहे. हल्ली उन्हाळा असल्यामुळे वसतिगृह, आश्रमशाळांतील मुले घरी परतली आहेत. पाण्याचा वापर वाढला असताना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

 

टँकरने पाणीपुरवठा : प्रशासनाकडून काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. काही गावांत आवश्यकता असताना त्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याची ओरड आहे. पाणी समस्या निर्माण झालेल्या गावांमध्ये बीडीओनी पाहणी केली. मात्र, जलजीवन मिशन योजना राबविणाऱ्या यंत्रणेचे अभियंता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात भेटी देण्याचे टाळले हे विशेष. बेला, मोथा या दोन गावात तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाmelghat-acमेळघाट