शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाने खड्डेमय रस्त्यावर लावले ‘फडतूस मार्ग’ असे फलक; पालकमंत्र्याचा केला निषेध

By उज्वल भालेकर | Updated: July 17, 2023 18:04 IST

शहरातील विद्युतभवन येथे सरकार विरोधात आंदोलन,

अमरावती : शहरातील कॅम्प परिसरातील गर्ल्स हायस्कूल ते पंचवटी मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सोमवारी उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने विद्युत भवन समोर आंदोलन करून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या मार्गाचे ‘फडतूस मार्ग’ असे नामकरण करत तसे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आले.

पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गांची चाळण झालेली आहे. अशाच प्रकारची रस्त्याची दुर्दशा ही कॅम्प परिसरातील गर्ल्स हायस्कूल ते पंचवटी या मार्गाची देखील झाली आहे. या रस्त्यावर विद्युत भवन तसेच शाळा महाविद्यालये असून रोज या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर नियमित वाहतूकही सुरु असते. परंतु रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्याच बरोबर हा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय तसेच अनेक शासकीय कार्यालयांकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. 

या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करुनही प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पालकमंत्री पद साेडून द्यावे, अन्यथा शहरातील रस्त्याची पाहणी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना गटाने केली आहे. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फडतूस मार्ग असे बोर्ड लावून राज्य शासनाचा निषेध नोंदविला. हे आंदोलन जिल्हा प्रमुख सुनील खराटे, माजी नगरसेवक प्रदीप बाजड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Politicsराजकारणroad transportरस्ते वाहतूकShiv SenaशिवसेनाagitationआंदोलनAmravatiअमरावतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस