शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पाठपुस्तके आलेत अन् सहा तालुक्यापर्यंत पोहोचती झाले

By जितेंद्र दखने | Updated: May 18, 2024 18:40 IST

Amravati : विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तक संच

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या मुलांना यावर्षीही मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात येऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी १ लाख ९० हजार ५६५ मुलांना मोफत पुस्तके दिली जाणार आहे. ही पाठपुस्तके पाठ्यपुस्तकालयात आलीत अन् आता तालुक्याकडे रवाना करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

 

नवीन शैक्षणिक सत्र २०२४-२५ येत्या १ जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यावर भर दिल्या जात आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी अनुदानित शाळांचा, अंशत: अनुदानित शाळांचा मोफत पाठ्यपुस्तक योजनेत समावेश केला आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील १४ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वरील शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीमधील १ लाख १८ हजार ९७९ तर सहावी ते आठवी मधील ७१ हजार ५८६ अशा एकूण १ लाख ९० हजार ५६५ विद्यार्थ्यासाठी मोफत पाठपुस्तके येथील पाठ्यपुस्तकालयात दाखल झालेली आहेत. या ठिकाणाहून ही पुस्तके  जिल्ह्यातील  अमरावती,भातकुली,धारणी,चांदुर रेल्वे,धामनगांव रेल्वे  आणि अंजनगाव सुजी या सहा तालुकास्तरावर पाठविली आहेत. तर उर्वरित ८ तालुक्यात लवकरच पाठपुस्तके पोहोचविली जाणार आहेत. तालुकास्तरावरून संबंधित शाळेत विद्यार्थ्यासाठी पुस्तकांचे संच नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. येत्या १ जुलै रोजी शाळा उघडणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याना पाठपुस्तके वितरीत केले जाणार आहेत. 

इयत्ता पहिली ते आठवीसाठी युडायस पटसंख्येनुसार ऑनलाइन पद्धतीने पाठ्यपुस्तकांची मागणी प्रत्येक तालुकास्तरावरून करण्यात आली होती. १ जुलैपासून शाळा सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे. बालभारती भवन अमरावती येथे पुस्तके प्राप्त झाली असून, येथून पाठ्यपुस्तके वितरित केले जात आहे.संगीता सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी

टॅग्स :SchoolशाळाAmravatiअमरावती