शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आदिवासींच्या ५५ हजार ६८७ पदांचा अनुशेष कायम

By गणेश वासनिक | Updated: March 23, 2025 16:13 IST

विशेष पदभरतीकडे सरकारचे दुर्लक्ष; विधिमंडळातील आश्वासनांचीही पूर्तता नाहीच.

गणेश वासनिक/ अमरावती  : राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीच्या ५५ हजार ६८७ पदांचा अनुशेष अद्यापही कायम आहे. यासंदर्भात शासनाने या पदांचा अनुशेष असल्याची माहिती शपथपत्रातून दिली आहे. एवढेच नव्हे मुख्यमंत्री आणि वित्त विभागाची मंजुरी घेऊन लवकरच अनुसूचित जमातीची विशेष पदभरती केली जाईल, अशी माहिती आयोगापुढे साक्ष दिली होती. असे असताना ‘ट्रायबल’ची ना विशेष पदभरती, ना विधिमंडळातील आश्वासनांची पूर्तता, असा कारभार सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ व उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २१ डिसेंबर २०१९ रोजी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची विशेष पदभरती करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला. मोजक्याच काही विभागाच्या जाहिराती प्रकाशित केल्यात, मात्र पूर्णपणे विशेष पदभरती राबविण्यात आलेली नाही. दरम्यान, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असता या आयोगासमोर राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची ८ ऑगस्ट २०२२ रोजी आदिवासी समाजाच्या पदभरतीवर अडीच तास साक्ष झाली. यावेळी त्यांनी शासकीय सेवेत १ लाख ५५ हजार ६९६ राखीव पदे असून, त्यापैकी १ लाख ९ पदे भरली आहे. अद्यापही शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची ५५ हजार ६८७ पदांचा अनुशेष कायम असल्याची माहिती शपथपत्रातून दिली होती. परंतु, पाच वर्षांचा कालावधी झाला असताना अनुसूचित जमातीची विशेष पदभरती राबविली नाही, हे वास्तव आहे.   तत्कालीन आमदारांचा तारांकित प्रश्न  विशेष पदभरती होत नसल्यामुळे २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केळापूर-आर्णीचे तत्कालीन आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी २ मार्च २०२१ रोजी ३१ क्रमांकावर तारांकित प्रश्न मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी आदिवासींची १२ हजार ५०० पदे बिगर आदिवासींनी बळकावल्याचे कबूल करून २०२१ पर्यंत आदिवासींची विशेष पदभरती करण्याची लेखी हमी विधिमंडळात दिली होती. लेखी उत्तरानंतरही विशेष भरतीप्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. विधिमंडळातील आश्वासनही हवेत विरले १० मार्च २०२२ ला विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी चर्चा झाली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर देऊन आदिवासींची विशेष भरती मोहीम राबविणार असल्याची घोषणा केली होती. नंतर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने १४ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ‘गट क’ व ‘गट ड’मधील पदे भरण्याची कार्यवाही ३१ जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विशेष पदभरतीसाठी विधिमंडळात अनेकदा आश्वासने आणि शासन निर्णयात डेडलाइन देणे हा नित्याचाच प्रकार झाला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती