शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हिंसा प्रिय मानणारा समाज आपल्या अखेरच्या घटका मोजतोय- सरसंघचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:32 IST

हिंसाचासामुळे कोणाचाही फायदा होत नसल्याचं मोहन भागवत यांचं वक्तव्य.

“हिंसाचारामुळे कोणाचाही फायदा होत नाही. ज्या समाजाला हिंसाचार प्रिय होता तो आता अखेरच्या घटका मोजत आहे,” असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. अमरावतीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशात मध्यंतरी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणलं पाहिजे आणि मानवतेचं रक्षण केलं पाहिजे, असं म्हटलं. हिंसाचारानं कोणाचं भलं होत नाही. आपण कायम अहिंसक आणि शांतीप्रिय असलं पाहिजे. आपल्याला प्राधान्यानं हे काम करण्याची गरज असल्याचंही भागवत म्हणाले.

“सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता आणि ‘रकार’ म्हणजे सरकार सत्ता असेपर्यंत सरकार राज्य करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असतात. मग ते सरकार कोणतेही असो. सरकारला समाजाच्या सोबत राहावे लागते आणि समाज ठरवेल तोपर्यंत सरकार राहू शकते,” असं भागवत म्हणाले. अमरावती शहरानजीकच्या भानखेडा मार्गालगत साकारण्यात आलेल्या संत कंवरधाम येथे संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडीया यांच्या ऐतिहासिक गद्दीनशीनी समारोह ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. “आज सर्व काही झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे आता संपूर्ण समाजाने सुद्धा एकत्र येऊन चांगला विचार करणे गरजेचे आहे. समाजाने वाईट विचार केला तर त्यातून गुंडगिरी निर्माण होऊ शकते, वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचे मन चांगले बनावे,” असंही ते म्हणाले. 

“मी तर सरकारमध्ये जात नाही, एकच गोष्ट सरकारने मला दिली, ती म्हणजे सुरक्षा. बस एवढेच माझ्याजवळ सरकारचे आहे, मी समाजाचा आहे, त्यामुळे मी सरकारमध्ये जात नाही, पण आपण सरकारमध्ये असलो तर चांगलं काम करू शकतो, मला इच्छा नसताना सुरक्षा मिळाली,” असं प्राजंळ मत भागवत यांनी मांडले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतMaharashtraमहाराष्ट्र