शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

‘लिव्ह इन’चा धक्कादायक अंत; 'त्याने' हाकलून दिलं, तिनं टोकाचं पाऊल उचललं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 15:48 IST

त्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन भाड्याच्या खोलीतून हाकलून दिले.

ठळक मुद्देलुंबिनी नगरातील घटनासहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

अमरावती : बराच काळ ‘लिव्ह इन’ मध्ये काढल्यानंतर जोडीदाराने हाकलून दिल्याने हतबल झालेल्या एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. १ मे रोजी दुपारी २ ते ३ च्या सुमारास लुंबिनी नगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, लुंबिनी नगर येथील एका तरुणीचे कपिल सोनोने याच्यासोबत सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते प्रेमसंबंध दोघांच्या घरी माहीत झाल्याने कपिलने लग्न करण्यासदेखील होकार दिला. त्यानंतर कपिल व ती तरुणी बरेच महिने ‘लिव्ह इन’मध्ये पती-पत्नीसारखे राहिले. परंतु,एप्रिल २०२१ पासून कपिलने तिच्यासोबत राहण्यास टाळाटाळ चालविली. त्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन भाड्याच्या खोलीतून हाकलून दिले. त्यानंतर आरोपी कपिल हा इंदूरला निघून गेला. ती त्याला भेटण्यास इंदूरला देखील गेली. मात्र, तो तेथे तिला भेटला नाही. उलट त्याने तिला मानसिक त्रासच दिला.

जानेवारीमध्ये दिली होती तक्रार

दरम्यान, १७ जानेवारी २०२२ रोजी तरुणीने कपिल सोनोने विरुद्ध महिला सेवाभावी संस्थांकडे तक्रार दिली. घरच्यांच्या दबावामुळे लग्न करू शकत नसल्याचे त्याने सांगितले. त्याने लग्नास नकार दिल्याने तिचे मनोधैर्य खचले. लिव्ह इनमध्ये राहूनही तो लग्नास नकार देत असल्याने तिने स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. १ मे रोजी दुपारी लुंबिनी नगर येथे राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या बहिणीला सहाही आरोपींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार मृताच्या भावाने ३ मे रोजी दुपारी नोंदविली. 

याप्रकरणी कपील अशोक सोनोने (२८), अशोक पुंडलिक सोनोने (५९), चंद्रमणी अशोक सोनोने (३०) व तीन महिला (सर्व रा. वरुणनगर,महादेवखोरी) अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारती मामनकर या करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAmravatiअमरावती