शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

अमरावतीतील आठ एसटी बसस्थानकांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:14 IST

एसटी महामंडळ : ४१ पैकी १९ सीसीटीव्ही कॅमेरे बंद, सुरक्षारक्षकही नाहीत, बसस्थानकाशेजारून केली जाते खासगी प्रवासी वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. परिणामी, एसटी महामंडळाच्या बसस्थानकाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच जिल्ह्यात ८ आगार आणि ७बसस्थानक, असे एकूण १७ आगार व बसस्थानक आहेत. यापैकी आगार असलेल्या ८ ठिकाणांचा अपवाद सोडला, तर ९ बसस्थानकांपैकी ८ बसस्थानकांत सुरक्षारक्षक नसल्याने ही बसस्थानके वाऱ्यावर आहेत.

अमरावती विभागात अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार, असे ८ आगार आहेत, तर वलगाव, मोझरी, चिखलदरा, धारणी, तिवसा, कुन्हा, धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी आणि राजापेठ, अशी ९ बसस्थानके आहेत. आजघडीला विभागात ७१ सुरक्षा रक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी सद्यःस्थितीत ६६ कार्यरत आहेत. यामध्ये अमरावती मध्यवर्ती बसस्थानक येथे एकूण १६ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी १२ सुरक्षारक्षक हे बसस्थानकावर प्रत्येक पाळीमध्ये ३ ते ४ असे एकूण १२ सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. त्याचप्रमाणे, राजापेठ बसस्थानक येथे सुरक्षारक्षकांची मंजुरात नसल्याने अमरावती बसस्थानकातील १४ पैकी ४ सुरक्षारक्षक राजापेठ बसस्थानक येथे कर्तव्य बजावतात.

४१ पैकी १९ सीसीटीव्ही कॅमेरे बंदजिल्ह्यातील आगार, बसस्थानकांमध्ये एकूण ४१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वाँच आहे. यामध्ये अमरावती मध्यवर्ती बसस्थानकात ९, वलगाव २, वरूड ६, चांदूर रेल्वे ६, धामणगाव रेल्वे २, तिवसा ४, दर्यापूर ४, अंजनगाव सुर्जी ४, मोर्शी ६, विभागीय कार्यशाळा ६ यांप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

आजघडीला ३० ठिकाणी कामे सुरू आहेत. परंतु, १९ ठिकाणी कॅमेरे बंद आहेत. यामध्ये वलगाव २, धामणगाव रेल्वे २, दर्यापूरचे ४, अंजनगाव सुर्जी ४, तपोवन कार्यशाळेतील ६ यांप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे हे मेन्टनन्सचे कंत्राट संपल्यामुळे, तर काही बांधकामे व नूतनीकरणाच्या कामामुळे बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

८७ बसेसअमरावती विभागासह इतर विभागांच्या ८७ बसेस आगार व बसस्थानकांवर मुक्कामी असतात, अशी माहिती आहे.

आगारात मुक्कामी बसेसअमरावती - २८राजापेठ - २०धामणगाव रेल्वे - ११परतवाडा - ०९तिवसा - ०६वरूड - ०३अंजनगाव सुर्जी - ०३चांदूर बाजार - ०१चिखलदरा - ०१कुन्हा - ०१

"एसटी महामंडळाच्या धोरणात्मक निर्णयानुसार केवळ मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षारक्षक नेमण्याची तरतूद आहे. यानुसार आजघडीला ८ आगार व एका बसस्थानकात सुरक्षारक्षक तैनात आहेत. मात्र, ८ बसस्थानकांत सुरक्षारक्षक नाहीत."- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

टॅग्स :Amravatiअमरावती