शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचा महसूल देणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ स्वतःचे ऑफिसचं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:39 IST

Amravati : चार महिन्यांपासून कार्यालयासाठी भटकंती

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : शासनाला लाखो रुपयांचा महसूल देणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयावर स्वतःचे कार्यालय शोधण्याची वेळ विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळी आली आहे. मागील चार महिन्यांपासून कार्यालयाची भटकंती सुरू आहे. खरेदी-विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले हे कार्यालय धारणी येथे आहे. त्यामुळे चिखलदरा तालुक्यातील नागरिकांना उलट प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांसाठी दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालय धारणी येथे आहे. दोन्ही तालुक्यांचा कारभार काही वर्षांपासून तेथे सुरू आहे. पूर्वी तो अचलपूर येथून चालायचा. धारणीचा उलटा प्रवास चिखलदरा तालुकावासीयांना करावा लागतो. परिणामी महिन्यातून दुसरा व चौथा मंगळवार आता चिखलदरा येथे हे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. मागील चार महिन्यांपासून अधिकारी चिखलदरा येतात. परंतु, त्यांना कार्यालय थाटण्यासाठी जागा न मिळाल्याने या सर्वाधिक महसूल देणाऱ्या शासकीय कार्यालयाची भटकंती सुरू आहे. दोन वर्षांपासून चिखलदरा तहसील कार्यालयाचे प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ते नुकतेच झाले असल्याने त्या इमारतीमध्ये हे कार्यालय थाटले गेल्यास नागरिकांना सोयीचे ठरणार आहे.

या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा मिळावी, यासाठी नुकतीच धारणीचे दुय्यम निबंधक आर.आर. बनसोड यांनी चिखलदऱ्याचे तहसीलदार जीवन मोरणकर यांची भेट घेतली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत एक कक्ष उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे चार महिन्यांपासून भटकंतीवर असलेल्या या कार्यालयाची वाताहत थांबून नागरिकांना न्याय मिळणार आहे.

अचलपूर सोयीचे, धारणीसाठी पायपीट चिखलदरा तालुक्याचा संपूर्ण कारभार परतवाडा शहरातूनच चालतो. त्यामुळे काटकुंभ, चुरणी, टेब्रुसोंडा या पट्ट्यातील नागरिकांना अचलपूर येथे दुय्यम निबंध कार्यालय सोयीचे होते. ते धारणीत गेल्याने उलट प्रवास त्यांना करावा लागतो. आता महिन्यातून दुसरा व चौथा मंगळवार चिखलदरा येथे कार्यालय नियमित कामकाज सुरू झाल्यास आर्थिक भुर्दड, प्रवासाची ससेहोलपट थांबणार आहे.

"चिखलदरा येथे दुसरा व चौथा मंगळवार दुय्यम निबंधक कार्यालय राहणार आहे. कार्यालयासाठी जागा तहसीलच्या नवीन प्रशस्ती इमारतीत मिळणार आहे. त्यामुळे जागेचा तिढा जवळपास सुटला आहे. लवकर कार्यालय कार्यान्वित होईल व नागरिकांना सोयीचे होईल." - आर.आर. बनसोड, दुय्यम निबंधक श्रेणी-१, धारणी.

 

टॅग्स :Amravatiअमरावती