शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या बहुप्रतिक्षित बदल्यांची यादी झळकली

By प्रदीप भाकरे | Updated: December 10, 2022 12:36 IST

निलिमा आरज पदस्थापनेच्या प्रतिक्षेत : रिता ऊईके ग्रामीणमधून शहरात

अमरावती : बहुप्रतीक्षेत पोलीस निरिक्षक, सहायक निरिक्षक व उपनिरिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांची यादी ९ डिसेंबर रोजी दुपारी जाहीर झाली. या बदली यादीमध्ये कोतवालीच्या ठाणेदार निलिमा आरज यांची बदली झाली असून, रिता ऊईके या ग्रामीणमधून शहर आयुक्तालयात येणार आहेत.

शहर पोलिस आयुक्तालयातून वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलिमा आरज यांची बदली झाली. आरज या सहायक पोलिस आयुक्त वा पोलिस उपअधीक्षक म्हणून पदोन्नतीस पात्र आहेत. त्यामुळे त्यांची बदली झाली असली तरी त्यांना पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. अमरावती ग्रामीणला पोलीस निरिक्षक असलेल्या रिता उईके यांची अमरावती शहर आयुक्तालयात, जळगाव येथे कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण आणि नांदेड येथून पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांची अमरावती ग्रामीणमध्ये बदली झाली आहे.

सहायक पोलीस निरिक्षक असलेले अरुण राऊत यांची एटीएस, अमुल बच्छाव यांची मुंबई शहर, सचिन इंगळे आणि हेमंत चौधरी यांची नागपूर शहर येथे बदली झाली आहे. तसेच अमरावती पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरिक्षक प्रशाली काळे यांची नागपूर शहर, दत्ता देसाई यांची लोहमार्ग पुणे, कविता पाटील यांची मुंबई शहर, राहुल जाधव यांची अमरावती परिक्षेत्राला बदली झाली आहे. याचवेळी वर्धा येथून सहायक पोलीस निरिक्षक मेघाली गावंडे, महेन्द्र इंगळे आणि एसआयडीमधून सहायक पोलीस निरिक्षक वैशाली चव्हाण या तीन अधिकाऱ्यांची अमरावती आयुक्तालयात बदली झाली आहे.

तसेच अमरावती शहर आयुक्तालयातून पीएसआय पंकज ढोके यांची नांदेड परिक्षेत्र, पीएसआय गणेश अहीरे यांची नाशिक परिक्षेत्र, पीएसआय अयुब शेख यांची नांदेड परिक्षेत्र, पीएसआय राजकिरण येवले यांची अमरावती परिक्षेत्रामध्ये बदली झाली आहे. याचवेळी अमरावती ग्रामिणमधील पीएसआय गणेश मुराडे यांची नांदेड परिक्षेत्र, पीएसआय मंजुषा ढोले यांची अमरावती आयुक्तालयात, नागपूर शहरातून पीएसआय तुळशिराम ढाकुलकर व पीएसआय मनिष गोडबोले यांची अमरावती शहर आयुक्तालयात बदली झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीAmravatiअमरावती