शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेचा आनंद ठरला क्षणिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 23:47 IST

दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या स्थितीवरून अपघाताची भयावहता स्पष्ट झाली. दुचाकीवरील तिघांपैकी घटनास्थळी दोघांचा, तर परतवाडा येथील खासगी रुग्णालयातून उपचारासाठी अमरावतीला नेत असताना एकाचा वाटेतच मृत्यू झाला.  चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचाही पूर्णतः चुराडा झाला. हे तिन्ही युवक रविवारी मध्य प्रदेशातील पूर्णामातेच्या यात्रेला गेले होते. रात्री मुक्कामाला राहून त्यांनी गाव गाठण्यासाठी प्रवास केला. मात्र, तो प्रवास अखेरचा ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मध्य प्रदेशातील भैसदेही तालुक्यात गुडगावनजीक भरणाऱ्या पूर्णामातेच्या यात्रेसाठी रविवारी गेलेल्या तिन्ही युवकांच्या दुचाकीला कारची धडक त्यांच्या जीवनाचा अंत करणारी ठरली. अचलपूर तालुक्याच्या येनी पांढरी व वडगाव येथील युवकांच्या अपघाताची माहिती कळताच तिघांचेही मित्र घटनास्थळी रवाना झाले. सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घटांग ते काटकुंभ मार्गावर भैसदेही तालुक्यातील देडपाणीनजीक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या स्थितीवरून अपघाताची भयावहता स्पष्ट झाली. दुचाकीवरील तिघांपैकी घटनास्थळी दोघांचा, तर परतवाडा येथील खासगी रुग्णालयातून उपचारासाठी अमरावतीला नेत असताना एकाचा वाटेतच मृत्यू झाला.  चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचाही पूर्णतः चुराडा झाला. हे तिन्ही युवक रविवारी मध्य प्रदेशातील पूर्णामातेच्या यात्रेला गेले होते. रात्री मुक्कामाला राहून त्यांनी गाव गाठण्यासाठी प्रवास केला. मात्र, तो प्रवास अखेरचा ठरला.  या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

अमित आणि राज घरात एकुलतेअपघातात राज नागापुरे व अंकुश पारस्कर (दोघेही रा. येनी पांढरी) व अमित ठाकूर (रा. वडगाव फत्तेपूर) ठार झाले. राजला तीन बहिणी आहेत. अमितही दोन बहिणींचा एकटा भाऊ होता. अंकुश पारस्करला धाकटी बहीण व भाऊ आहे. या तिघांच्याही घरावर तसेच गावातही शोककळा पसरली आहे. 

कुटुंबाची भिस्त कोसळली, वडील करतात मजुरीतिन्ही युवक अविवाहित आणि होतकरू होते. पैकी दोघे ऑटोरिक्षाचालक होते. एक वाहन चालविण्याचे काम करायचा. त्यातून ते परिवाराला आर्थिक मदत करीत असत. राजचे वडील शिंपीकाम करतात, तर अंकुशचे वडील शेतमजूर आहेत. अमितचे वडीलही मजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात. 

हवेत उडाली दुचाकी :  अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी चारचाकीवरून उसळून हवेत झेपावली आणि खाली कोसळली. त्यातील एक युवक दोनशे फुटांवर फेकला गेला, तर दुसरा वाहनासह ५० फूट घासत गेला. तिसरा रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी गावकऱ्यांना दिली.

 

टॅग्स :Accidentअपघात