शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे 'आरोग्य' बिघडले; वर्ग १ व २ ची जेष्ठता यादी चक्क २० वर्षांनी प्रसिद्ध!

By गणेश वासनिक | Updated: September 24, 2023 14:12 IST

१ एप्रिल १९९६ ते ३१ डिसेंबर २००८ या कालावधीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी १७ मे २०१६ रोजी प्रसिद्ध केली

अमरावती : महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा गट अ संवर्गामधील वर्ग १ व २ ची एकत्रित सेवाजेष्ठता यादी चक्क २० वर्षानी प्रसिद्ध केल्याचा प्रकार सार्वजनिक आरोग्य विभागात निदर्शनास आला आहे. १ एप्रिल १९९६ ते ३१ डिसेंबर २००८ या कालावधीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी १७ मे २०१६ रोजी प्रसिद्ध केली. त्यामुळे बहुतांश वैद्यकीय अधिकारी ज्या पदावर नियुक्त होऊन रूजू झाले त्याच पदावर सेवानिवृत्तही झाले.

प्रसिद्ध केलेली यादी सदोष असल्यामुळे अनेकांनी आक्षेप नोंदविले. परंतू या आक्षेपांची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीत. आक्षेपांचे कागदपत्रे कचरा पेटीत कोंबले. पुढील कालावधीत तरी या अंतिम यादीतील चुका दुरुस्त करुन संदर्भ घ्यायला पाहिजे होता.परंतु तसे करण्यात आले नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात सावळागोंधळ निर्माण झाला आहे. पुन्हा तशीच १ जानेवारी २०२१ रोजी सेवाजेष्ठता यादी २०२२ मध्ये प्रसिद्ध केली. 

ती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व विशेषज्ञ या तीन संवर्गातील आहे. वर्ग १ संवर्गमधून पुढील वरीष्ठ वर्ग १ पदाचे संवर्गासाठीची सामाईक जेष्ठता यादी आहे. ती पण सदोष असून तात्पुरती आहे. या गोंधळामुळे सर्व महत्वाची वरिष्ठ वर्ग १ ची व वर्ग २ ची पदे अगदी ‘टॉप टू बॉटम’ ासार्वजनिक आरोग्य विभागात रिक्त आहेत. सेवाज्येष्ठता यादीबाबत मंत्रालयातील अवर सचिव (सेवा -२) व्ही.पी. गायकवाड यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत, हे विशेष.

ज्या पदावर रुजू त्याच पदावर निवृत्तसार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवाजेष्ठतेसंबंधी असलेल्या अनागोंदी कारभारामुळे वैद्यकीय सेवेत वर्ग- २ गट अ पदावर १९९६ मध्ये रुजू झालेले डॉ. पांडुरंग भारमल हे १८ नोव्हेंबर १९९८ रोजी गट अ मधून एमपीएससी उत्तीर्ण झाले. तरी त्याच वर्ग- २ पदावरूनच ३१ जुलै २०२२ रोजी निवृत्त झाले. डॉ. बापू चाबुकस्वार १९९४ रोजी वर्ग २ पदावर रुजू झाले. त्याच पदावर असताना मयत झाले. डॉ. बुधाजी लहामटे वर्ग २ पदावर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्याच पदावर २०१६ रोजी निवृत्त झाले. त्यामुळे अनेक अधिकारी पदोन्नती पासून वंचित आहेत.

आयुक्त पदी 'आयएएस' दर्जाचे अधिकारीसार्वजनिक आरोग्य विभागात सनियंत्रणासाठी गेल्या काही वर्षांपासून 'आयएएस' दर्जाचे अधिकारी नेमले जात आहेत. पण प्रशासनात मात्र तसुभरही सुधारणा झालेली नाही. मग अशा 'आयएएस' दर्जाच्या अधिका-यांचा उपयोग तरी काय? असा सवाल आरोग्य विभागातील अधिकारी करीत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य