शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाचा बिगुल वाजला, ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

By गणेश वासनिक | Updated: August 1, 2024 19:06 IST

महाराष्ट्रात लवकरच निवडणूक आचारसंहिता? : अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आयोगाने दिले संकेत

अमरावती : तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या त्वरित बदल्या करा, असा फतवा निवडणूक आयोगाने जारी केला आहे. याचा अर्थ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार? असे संकेत आयोगाने ३१ जुलै २०२४ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे दिलेले आहेत.

निवडणूक आयोग शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवडणूक काळात धोरण अवलंबित असते. निष्पक्षपणे निवडणूक घेण्यासाठी आयोग लोकांशी संबंध येणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय घेऊन ज्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी सलग तीन ते चार वर्षे झालेली आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात करतात. २०२४ मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने आयोग कामाला लागलेला आहे.

गृह जिल्ह्याच्या बाहेर काढामहाराष्ट्रातील ज्या शासकीय अधिकाऱ्यांना एका जागेवर तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत, अशा अधिकाऱ्यांची संबंधित विभागाने यादी तयार करुन अशा अधिकाऱ्यांची बदली गृह जिल्ह्याबाहेर करावी, असा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून बाहेर पडावे लागेल, हे विशेष. यात राज्य सेवेतील ३९ विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदली ठिकाणी जावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बदलीचे आदेश धडकण्याचे संकेत आहेत.

आरोग्य, वन, महसूलचे अधिकारी ठाण मांडूननिवडणूक आयोगाने ज्या शासकीय अधिकाऱ्यांना गृह जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत व असे अधिकारी निवडणूक प्रक्रिया बाधित करु शकतात, अशा अधिकाऱ्यांना बाहेर काढण्याचा आदेश दिला आहे. मात्र आरोग्य, महसूल, वनविभागात वर्ग १ च्या दर्जाचे अधिकारी हे आपापल्या गृह जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले आहेत. अमरावती जिल्ह्यात वनविभागात किमान २५ अधिकारी असे आहेत की, त्यांचा गृह जिल्हा आहे. अनेकांचे राजकीय नेत्यांशी चांगले लागेबांधे आहेत. काही वनाधिकारी तर आमदार, मंत्र्यांच्या पत्राने ठाण मांडून जिल्ह्यात आहेत.

टॅग्स :TransferबदलीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Code of conductआचारसंहिता