शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल फिल्डमधील ‘डिस्काऊंट वॉर’ पोहोचले ठाण्यात

By प्रदीप भाकरे | Updated: June 2, 2023 17:17 IST

असोसिएशनच्या अध्यक्षासह २८ मेडिकलधारकांविरूद्ध गुन्हा

अमरावती : मेडिकल फिल्डमधील ‘डिस्काऊंट वॉर’ चक्क पोलीस ठाण्यात पोहोचले. तो वाद तेथे शमला नाही. घटनेच्या आठवडाभरानंतर मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्षांसह तब्बल २८ पेक्षा अधिक मेडिकल संचालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ जून रोजी उघड झालेल्या या वॉरमुळे मेडिकल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमोल सार्वे (४५, मायानगर) यांनी तक्रार नोंदविली. अन्य मेडिकलच्या तुलनेत जेनरिक व कंपनीचे थेट आऊटलेट अधिक डिस्काऊंट देते, त्यातून हा वाद निर्माण झाला.

तक्रारकर्ते अमोल सार्वे हे एका मेडिकल कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत. त्या कंपनीचे शहरात पाच मेडिकल शॉप आहेत. ते ग्राहकांना एमआरपीपेक्षा २० ते २७ टक्के डिस्काउन्ट देत औषधविक्री करतात. आमच्या त्या ‘विथ डिस्काऊंट’ विक्रीला अमरावतीच्या काही मेडिकलधारकांचा नेहमी विरोध असतो, आम्ही डिस्काऊंट देऊ नये, अशी त्यांची भूमिका असल्याचे सार्वे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान २३ मे रोजी अमरावती केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी व अन्य २७ पेक्षा अधिक जण त्या कंपनीच्या साईनगर, शिलांगण रोड, नवाथे नगर, रविनगर व गणेश कॉलनी येथील मेडिकल शाखेत गेल्याचा आरोप आहे.

मालानी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या कंपनीच्या मेडिकलमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना धमकावले. काचेवरील व शॉपच्या आतील डिस्काऊन्टचे बॅनर व स्टिकर फाडले. ग्लोसाईन बोर्डवर वायर तोडले. दुकानात अनधिकृतपणे शिरून काऊंटरवरील बिल व कागदपत्रे हुसकविले. त्यांनी व्हिडीओ शुटिंग देखील केली. या सर्व प्रकाराचा ग्राहक व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास झाला. यात सुमारे ८० हजारांचे नुकसान झाल्याचे सार्वे यांनी म्हटले आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

सौरभ मालानी, प्रवीण देशमुख, संजय बोबडे, राजा नानवाणी, मनोज डफळे, योगेश देशमुख, अंकुश अग्रवाल, सागर आडे, संजय नानवाणी, दिप नाथाणी, आनंद अग्रवाल, हरिश लढ्ढा, सारंग सर्यवंशी, कौशल सारडा, अनिल टाले, गोविंद केला, पंकज डाफ, सचिन रहाटे, अक्षय ढोरे, विक्की खेरडे, श्रीेकांत नवाथे, प्रफुल देऊळकर, सौरभ केवळे, शैलेश सोनटक्के, अनुराग मालानी, अमित तापडिया, जय छाबडिया.

आम्हालाही व्यापार करायचा आहे. ते डिस्काऊंट फलक लावून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. जिल्हयातील दोन हजार कुटुंबाचा प्रश्न आहे. ती फलके काढण्याची विनंती केली होती.

- सौरभ मालाणी, अध्यक्ष, अमरावती केमिस्ट असोसिएशन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHealthआरोग्यAmravatiअमरावती