शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदासबाबावर बलात्काराचा गुन्हा, महिलेवर ३ महिने अत्याचार करून बनविली अश्लील चित्रफीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 09:37 IST

Crime News: तिवसा येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याने मध्य प्रदेशातील एका भक्त महिलेवर तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनविली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांत गुरुदासबाबावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तिवसा (जि. अमरावती) : मार्डी (ता. तिवसा) येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याने मध्य प्रदेशातील एका भक्त महिलेवर तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनविली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांत गुरुदासबाबावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपल्या पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी जबलपूर येथील ३४ वर्षीय महिला २ मे २०२३ रोजी बाबाच्या मार्डी येथील आश्रमात आली होती. पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल, असे तिला सांगण्यात आले. तिने आश्रमात राहण्याची तयारी दर्शवली. यादरम्यान तीन महिन्यांपर्यंत भोंदूबाबाने तिच्यावर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण केले. लग्नाचेही अमिष दाखविले. दुष्कृत्यानंतर झाला फरारएक दिवस महिलेला मोबाइलमध्ये त्याने केलेल्या कुकर्माची चित्रफीत दिसली. तिने जाब विचारला असता, गुरुदासबाबाने दमदाटी करून धमकावले व २ जानेवारीला तिला नागपूरला सोडून  तो फरार झाला. 

आधी गाजला गरम तवा - काही महिन्यांपूर्वी याच भोंदू सुनील कावलकरने गरम तव्यावर बसून लोकांच्या समस्या सोडवित असल्याचा व्हिडीओ जारी केला होता. त्याबाबत चौकशी होताच चारधामच्या बहाण्याने पसार झाला होता. - यादरम्यान महिलेवर अत्याचार करून तो पुन्हा फरार झाला आहे. पहिल्या प्रकरणातच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुरुदासबाबावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हाच त्याच्या मार्डी आश्रमातून कुऱ्हा पोलिसांनी अटक का केली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती