शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

अमरावती महापालिकेत उच्चाधिकाऱ्यांचे वर्तुळ पूर्ण, आता हवेत ‘ईओ’

By प्रदीप भाकरे | Updated: April 18, 2023 13:14 IST

मुख्यलेखापरिक्षकही एप्रिलअखेर निवृत्त : पाचही सहायक आयुक्त प्रभारी

अमरावती : उपायुक्तपदी जुम्मा प्यारेवाले यांची नियुक्ती करून नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनातील पहिल्या रांगेतील उच्चाधिकाऱ्यांचे वर्तुळ पूर्ण केले आहे. महापालिकेला अनेक वर्षानंतर अतिरिक्त आयुक्त व दोन्ही उपायुक्त एकाचवेळी लाभले आहेत. प्यारेवाले यांच्यासह उपायुक्त प्रशासन म्हणून मेघना वासनकर व अतिरिक्त आयुक्त म्हणून देविदास पवार कार्यरत आहे. शहर अभियंता कार्यरत असल्याने आता केवळ शिक्षणाधिकारी तेवढे प्रतिनियुक्तीचे हवे आहेत.

चार वर्षांपूर्वी विनायक औगड यांच्या निवृत्तीने महापालिकेत उपायुक्तपदी प्रभारराज निर्माण झाले. औगड यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर नगरविकास विभागाने अधिकारी न पाठविल्याने त्या पदाचा प्रभार महापालिकेतील पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख यांच्याकडे गेला. तर विजय खारोटे यांची बदली झाल्याने सामान्य उपायुक्तपद देखील रिक्त झाले. तेथे देखील अधिकारी पाठविण्यात न आल्याने ते पद महिला व बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांना देण्यात आले.

पुढे दोन वर्षानंतर सुरेश पाटील हे प्रतिनियुक्तीचे अधिकारी उपायुक्त प्रशासन म्हणून रूजू झाले. तर सामान्य उपायुक्तपदी देखील रवी पवार हे प्रतिनियुक्तीचे अधिकारी आले. मात्र ते देखील सहाच महिन्यात बदलीवर गेल्याने पुन्हा उपायुक्त सामान्य पद रिक्त झाले. ते पद पुन्हा नरेंद्र वानखडे यांना देण्यात आले. मध्यंतरी तेथे तीन महिन्यांसाठी अमित डेंगरे यांनी देखील जबाबदारी सांभाळली. तर, गेल्या एक वर्षांपासून तो पदभार वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नैताम यांच्याकडे आहे. दरम्यान सुरेश पाटील हे निवृत्तीच्या आधी मुळ विभागात गेल्याने उपायुक्त प्रशासन पदाचा प्रभार मुळच्या सहायक आयुक्त भाग्यश्री बोरेकर यांना देण्यात आला. मात्र, त्याही वैद्यकीय रजेवर गेल्याने काही काळ त्या पदाकडील विभाग अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आले होते.

दरम्यान, उपायुक्त प्रशासनपदी शासनाने मुख्याधिकारी ‘अ’ संवर्गातील मेघना वासनकर यांच्या रूपाने प्रतिनियुक्तीचा अधिकारी दिला. तर त्यापूर्वी हर्षल गायकवाड यांच्या बदलीने रिक्त झालेल्या अतिरिक्त आयुक्तपदी देविदास पवार रूजू झाले. तर मंगळवारी जुम्मा प्यारेवाले रूजू झाल्याने आयुक्तांसह चारही उच्चाधिकाऱ्यांचा कोरम अनेक वर्षानंतर पूर्ण झाला.३० एप्रिल रोजी ऑडिटर निवृत्त

प्रिया तेलकुंटे यांची बदली झाल्याने राम चव्हान हे मुख्य लेखापरिक्षक म्हणून रूजू झालेत. ते ३० एप्रिल रोजी नियत वयोमानाने निवृ्त्त होत आहेत. त्यामुळे ते पद देखील रिक्त होणार आहे. मात्र लेखा विभागातील मुख्य लेखाधिकारी व मुख्यलेखापरिक्षक़ ही पदे अत्यंत महत्वाची व गॅझेटेड ऑफिसर्सची पदे असल्याने शासन ती रिक्त ठेवत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे ३० एप्रिलनंतर लगेचच नवे ऑडिटर मिळण्याचे संकेत आहेत. तर पाचही सहायक आयुक्त प्रभारी असल्याने तेथे देखील अधिकारी द्यावेत, असा पाठपुरावा आयुक्तांनी चालविला आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकार