शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाही लागला ब्रेक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:07 IST

नवीन अर्ज स्वीकारणे बंद : मबाक विभागाच्या सचिवांच्या सुचना

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत ७ लाख १६ हजार ९०५ लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले आहेत. यामधून ६ लाख ९९ हजार ७१६ अर्ज मंजूर केलेले आहेत. तर ७५ हजार २११ लाडक्या बहिणींचे आधार सिडिंग न झाल्याने त्यांचे अद्यापही पैसे जमा झाले नाहीत.

याशिवाय १० हजार ३३० अर्ज पडताळणीमध्ये आहेत. अशातच आता मंगळवारी दुपारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे प्रतीक्षेतील महिला लाभार्थीच्या खात्यात २३ नोव्हेंबरनंतरच अनुदान जमा होणार आहे. सोबतच आता नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी बुधवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या घेतलेल्या व्हिसीवरील सभेत सूचना दिलेल्या आहेत. 

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये नारीशक्ती अॅपवर ३ लाख ९८ हजार ३४१ महिलांनी अर्ज केले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या पोर्टलवरून ३ लाख १ हजार ४२ महिलांनी पुन्हा या योजनेकरिता नोंदणी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १६ हजार ९०५ महिलांनी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज केले आहेत. यापैकी आतापर्यंत ६ लाख ९९ हजार ७१६ महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी ४ हजार ३६३ महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर १०,३३० हजारांवर अर्ज पडताळणीमध्ये आहेत. अशातच जिल्ह्यात अद्यापही ७५ हजार २११ महिलांचे आधारकार्ड बँकेला संलग्न नसल्याने त्यांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे त्यांचे सिडिंग झाल्यानंतर बँक प्रक्रियेतील अनुदान त्या लाभार्थीना प्राप्त होईल; परंतु नव्याने अर्ज करणे व पुढील टप्पा याशिवाय त्रुटीत असलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेला मात्र आचारसंहितेमुळे आता ब्रेक लागला आहे, त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे. 

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती