वरूडमध्ये वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:46+5:30

तालुक्याला सातपुडा पर्वताची किनार लाभली असून, १० हजार हेक्टरपेक्षा मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी आहेत. आता त्यात वाघांचीसुद्धा भर पडली. लिंगा, करवार, कारली, पंढरी, वाई, जामगांव, करवार, एकलविहीर, लोहदरा परिसरात वाघांचा वावर आहे. दिवसागणिक शेतकरी, शेतमजुरांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरतून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने अनेक वाहनचालकांना बिबट्यांचे दर्शन घडले आहे.

Terror of tigers in the Warud | वरूडमध्ये वाघाची दहशत

वरूडमध्ये वाघाची दहशत

Next
ठळक मुद्देतालुक्यात अनेक जनावरांचा फडशा : वनविभागाची शोधमोहिम, ट्रॅप कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यातील गाडेगाव व बेनोडा जंगलात वाघाची पदचिन्हे आढळल्याने शेतकरी तथा खेडुत दहशतीत आले आहेत. वाघाच्या अस्तिवाला वनविभागाने दुजोरा दिला असून, ज्या भागात वाघ आढळल्याचा दावा करण्यात येत आहे, त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
तालुक्याला सातपुडा पर्वताची किनार लाभली असून, १० हजार हेक्टरपेक्षा मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी आहेत. आता त्यात वाघांचीसुद्धा भर पडली. लिंगा, करवार, कारली, पंढरी, वाई, जामगांव, करवार, एकलविहीर, लोहदरा परिसरात वाघांचा वावर आहे. दिवसागणिक शेतकरी, शेतमजुरांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरतून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने अनेक वाहनचालकांना बिबट्यांचे दर्शन घडले आहे. यामुळे सदर परिसर हा व्याघ्र प्रकल्प घोषित करावा, अशी मागणी जोर धरत आहे. २३ फेब्रुवारी रोजी बेनोडा परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने मोर्शी, वरूडच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यानी वाघासाठी संयुक्त शोधमोहीम उघडली आहे.
तत्पूर्वी २१ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास गोरेगांव परिसरात वाघाने गोकुल घारड, नरेंद्र घाटोळे या शेतकऱ्यांच्या तीन गार्इंचा फडशा पाडला. तोच वाघ बेनोडा, पळसोना परसिरात आल्याची ओरड सुरू झाली आहे. त्या ठिकाणी वाघाच्या पायांचे ठसे मिळाले आहेत. त्यामुळे संपूर्ण शिवार ओस पडले आहे.

पाणवठे आटल्याने नागरी वस्तीकडे धाव
उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पाणवठे आटल्याने जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तहान भागविण्याकरिता हिंस्त्र प्राणी गावाकडे कूच करुन पाळीव जनावरांचा फडशा पाडतात. प्रसंगी मानवावरही हल्ले करण्याच्या घटना ताज्या आहेत. तूर्तास वरुड, महेंद्री जंगलातील पाणवठे आटले आहेत.

तालुक्यातील जरूड, बेनोडा, पळसोना, गोरेगाव शिवारात वाघाचा वावर आहे. वरूड व मोर्शी वनविभाग संयुक्तपणे शोधमोहिम राबवित आहेत. युद्धपातळीवर वाघाचा शोध घेतला जात आहे.
-प्रशांत लांबाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरूड

Web Title: Terror of tigers in the Warud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ