शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! कार नाल्यात कोसळून सहा ठार, एक गंभीर; रस्त्यावरील सीट कव्हरवरून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 06:04 IST

पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायला निघालेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

परतवाडा (जि. अमरावती) : पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायला निघालेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले. परतवाडा ते बैतुल मार्गावरील निंभोरा फाटा येथे रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. 

मात्र, रस्त्यावर पडलेल्या सीट कव्हर वरून पोलिसांना शंका आल्याने या अपघाताचा उलगडा झाला. त्यांनी अपघातग्रस्तांना तत्काळ वाहनातून काढून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एका गंभीर जखमीला अमरावतीला हलविण्यात आले आहे. 

पांडुरंग रघुनाथ शनवारे (३०, चांदूर बाजार), सतीश सुखदेव शनवारे (३०, बहिरम कारंजा), सुरेश विठ्ठल निर्मळे (२५, खरपी), चारचाकींचा चालक रमेश धुर्वे (३०,  सालेपूर) तसेच दुचाकीस्वार प्रतीक दिनेश मांडवकर (२६), अक्षय सुभाष देशकर (२६, चांदूर बाजार) अशी मृतांची नावे आहेत. संजय गजानन गायन (२२, बोदड) हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास पोलिसांची चमू नियमित गस्तीवर होती. त्यांना सीट कव्हर रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेत दिसले. शंका येऊन पोलिसांनी पाहणी केली असता, दुचाकी व कार नाल्यात अपघातग्रस्त अवस्थेत निदर्शनास आली. बहिरम मार्गावर एक हार्डवेअर प्रतिष्ठान आहे. येथून चालकासह पाचजण चारचाकीने निघाले. निंभोरा फाट्याजवळ पोहोचताच त्यांच्या चारचाकीने  दुचाकीला धडक दिली. यामुळे चारचाकी अनियंत्रित होऊन पुलावरून नाल्यात कोसळली.

टॅग्स :Accidentअपघात