लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येत्या २०२०-२०२१ शैक्षणिक सत्रात परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाईन कामांसाठी नवीन एजन्सी नियुक्तीसाठी ई-निविदा काढण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी फायलींवर स्वाक्षरी केल्याची माहिती आहे.सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ आणि अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार परीक्षेचे कामकाज ऑनलाइन आवश्यक करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २०१६ मध्ये परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाइन कामांसाठी बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सी नेमण्यात आली. मात्र, परीक्षेचे ऑनलाइन कामे सुरू असतानासुद्धा निकालाची ढकलगाडी कायम होती. अशाचत मॅकेनिक्स अभियांत्रिकी पेपरफूट प्रकरणाने परीक्षा आणि निकालात त्रुटी, घोळ असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी विद्यापीठाने माइंड लॉजिकची हकालपट्टी करीत या एजन्सीकडे परीक्षेचे ‘एन्ड टू एन्ड’ ऑनलाईन कामे काढून घेण्यात आली.आता हिवाळी २०१९ परीक्षेपासून परीक्षा आणि निकाल ऑफलाइन पद्धतीने सुरू आहे. मात्र, नव्याने परीक्षेची कामे आॅनलाइन पद्धतीने सुरु असावी, यासाठी नव्या एजन्सीचा शोध घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने १३ डिसेंबर २०१९ रोजी पार पडलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत नवी एजन्सी नियुक्त करण्याबाबत निर्णय झाला आहे.ई-निविदा काढण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी फायलीवर स्वाक्षरी केली आहे. आता अटी, शर्तीच्या आधारे ई-निविदा प्रकाशित करण्यात येणार आहे. एजन्सी निश्चित झाल्यानंतर करारनाम्याचे प्रारूप व्यवस्थापन समितीच्या पुढ्यात निर्णयासाठी ठेवले जाईल.सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ ऑनलाइन कामांसाठी एजन्सी नेमण्याची प्रशासनाने तयारी चालविली आहे.करारनाम्यात नमूद करावयच्या काही बाबी स्पष्ट आहे. त्यानुसार ई-निविदाद्वारे एजन्सी नेमली जाणार आहे. अगोदरच्या चुका लक्षात घेता, आता परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ ऑनलाइन कामांसाठी पायाभूत सुविधा असलेल्या एजन्सीला प्राधान्य असेल.- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ
परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’साठी नव्या एजन्सीकरिता निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ आणि अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार परीक्षेचे कामकाज ऑनलाइन आवश्यक करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २०१६ मध्ये परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाइन कामांसाठी बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सी नेमण्यात आली. मात्र, परीक्षेचे ऑनलाइन कामे सुरू असतानासुद्धा निकालाची ढकलगाडी कायम होती.
परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’साठी नव्या एजन्सीकरिता निविदा
ठळक मुद्देकुलगुरूंची फाईलवर स्वाक्षरी : परीक्षा मंडळाच्या बैठकीत मंथन