शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

शेतक-यांना सवलतीत दरमहा दहा हजार टन धान्य; आत्महत्या रोखण्यासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:45 IST

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला.

अमरावती - दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला. यात मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अमरावती विभागातील शेतकरी सुमारे १० हजार मेट्रिक टन अन्न-धान्याची उचल दरमहा करीत आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर गरजू शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू वितरित करण्यात येत आहे. सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानांमार्फत दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत अनियमित आणि कमी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नापिकीमुळे शेतक-यांची अवस्था बिकट झाली आहे. विभागात सर्वाधिक सहा लाख तीन हजार ३३२ लाभार्थी अमरावती जिल्ह्यात आहेत. याच जिल्ह्यातील शेतक-यांकडून ३ हजार १७ मेट्रीक टन धान्याची उचल होते. त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यात चार लाख ३१ हजार १२१ लाभार्थी असून दोन हजार १५५ मे. टन धान्याची येथील शेतकरी उचल करतात. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख पाच हजार २१५ शेतक-यांकडून दोन हजार २६ मे. टन धान्याची उचल होते. अकोला जिल्ह्यात दोन लाख ५२ हजार ९३० शेतकरी एक हजार २६५ मे.टन तर वाशिम जिल्ह्यात दोन लाख ४६ हजार ९५७ शेतकरी एक हजार २३५ मे. टन धान्याची उचल करीत आहे.

विभागात १९ लाख शेतकरी लाभार्थीअमरावती विभागात पाचही जिल्ह्यांतील शेतक-यांची संख्या १९ लाख ३९ हजार ५५५ आहे. या शेतकऱ्यांद्वारा सहा हजार २५० मेट्रीक टन गहू, तर तीन हजार ४४८ मेट्रीक टन तांदूळ असा एकूण नऊ हजार ६९८ मेट्रीक टन धान्याची उचल प्रत्येक महिन्याला करीत आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील शेतकºयांना या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.