लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवरील सालबर्डी येथे टाकलेल्या धाडीत सागवानासह दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.सालबर्डी येथे अनेक दिवसांपासून जंगलातील सागवान अवैधरीत्या कटाई करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. त्यापासून विविध नक्षीदार फर्निचर तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती वनविभागास प्राप्त झाली. येथील वनपरिक्षेत्राधिकारी आनंद सुरत्ने यांनी त्याबाबत मध्यप्रदेश शासनाच्या वनविभागाशी चर्चा करून संयुक्तरीत्या कारवाई करून अंदाजे एक लाख रुपयांचे सागवान, नक्षीदार काम करण्याचे यंत्र व अन्य साहित्य जप्त केले. याप्रकरणी अवैध सागवान विक्रेता शेख हनिफ मुस्ताक (सालबर्डी) याला अटक करण्यात आली.सदरच्या कारवाई उपवनसंरक्षक अधिकारी गजेंद्र नरवण, वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने, वरूड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत लांबाडे तसेच फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर, मध्य प्रदेशातील आठनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंडलीये, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश बोलोदे, वनपाल पाटणकर, वनरक्षक रिना पवार, नलिनी कोथलकर यांनी केली.
सालबर्डी येथून सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST
सालबर्डी येथे अनेक दिवसांपासून जंगलातील सागवान अवैधरीत्या कटाई करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. त्यापासून विविध नक्षीदार फर्निचर तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती वनविभागास प्राप्त झाली.
सालबर्डी येथून सागवान जप्त
ठळक मुद्देवनविभागाची कारवाई : नक्षीकामाची यंत्रही घेतले ताब्यात