शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

शिक्षक दिन विशेष; पोटाची भूक हाच माझा गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 7:00 AM

गुरुजी तुम्ही ज्ञानदाता आहात. तुमचे कर्तृत्वच विद्यार्थ्यांना घडवणार आहे. गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा. पगारासाठी नव्हे तर माझा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी अध्यापन करा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देशिक्षकांमुळे वाचनाची गोडीदत्तात्रयांसारखे माझेही अनेक गुरूवाचनाच्या आवडीपोटी बिळात कागद लपविला नि मुंगूस चावला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: गुरुजी तुम्ही ज्ञानदाता आहात. तुमचे कर्तृत्वच विद्यार्थ्यांना घडवणार आहे. गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा. पगारासाठी नव्हे तर माझा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी अध्यापन करा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी येथे व्यक्त केली.वांदिले मास्तरांनी मारले, कांबळे गुरुजींनी जीव लावलाचिखलदरा हे कार्यक्षेत्र असलेल्या सिंधुताई सपकाळ सांगतात, वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावातील उत्तर बुनियादी शाळेत मी शिकले. म्हशी पाण्यात बसल्या की, मी शाळेत जायचे. त्यासाठी वांदिले मास्तरने अनेकदा मारले. शद्धलेखनही त्यांच्यामुळेच समजले. नुकत्याच नोकरीवर लागलेल्या कांबळे गुरूजींनी मला जीव लावला. काळजी घेतली.भाषणातून रेशन मिळते, ते माझ्या मुलांना जेऊ घालतेमी केवळ चौथी शिक लेली. लौकीकार्थाने तशी निरक्षरच. मात्र शिकली, सवरली ते समाजातून. ३५० लेक रांची आई असलेली ‘मी’ वयाच्या २० व्या वर्षी खचले; पण तेवढ्याच ताकदीने उठले. एकाकी लढा दिला. स्मशानात राहिले. कधीकाळी संसारातून उठले. आता ३५० मुले, ४९ सुना, २८२ जावई अशा भल्यामाठ्या संसाराची कुटुंबप्रमुख आहे.लहानपणी चाफ्याच्या फुलांतून खरकटे अन्न खाल्ले. जळणाऱ्या प्रेताच्या निखाऱ्यावर मी भाकरी भाजली. आज भाषणांतून रेशन मिळते. त्यातून मी माझ्या मुलांना खाऊ घालते. स्वत:च्या मुलांना विसरून विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक आजही आहेत.शिक्षकांमुळेच वाढेल देशाचा लौकीकचौथीत असताना गुरूजी शाळेत उशिरा येते म्हणून मारायचे. तर मोकाट म्हशी शेतात शिरल्या म्हणून शेतकरी थेट वर्गात शिरायचा. दोन्हीकडून मार. तेव्हाचे शिक्षक झोकून देऊन ज्ञानदान करायचे. आज अपवाद वगळता शिक्षक हा पेशा, व्यवसाय झालाय. मोजक्या का होईना; पण शिक्षकांमुळेच या देशाचा लौकीक वाढेल.अक्षरे लिहिलेली कागदं चाऊन खायची...शिक्षकांमुळे वाचनाची गोडी लागली. रस्त्यावरची कागदं उचलून धुऊन ती मी वाचायची. पतीला वाचन पटेचना. उंदरांच्या, मुंगसांच्या बिळात ती कागदं मी लपवायची. एकदा मुंगूसही चावला. पतीने माझ्यासमोर ती फाडू नये यासाठी मी अक्षर लिहिलेली कागदं चावून खायची. नवऱ्यापासून २० व्या वर्षी विभक्त झाले. आयुष्य काळोखमय झाले ;पण निर्धार अन् ज्ञानामुळेच मला जग लख्खपणे दिसू शकले, अन्यथा ज्ञानाशिवाय मी आंधळीच असते..

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन