शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शिक्षकांची सीईटीने नियुक्ती

By admin | Updated: January 8, 2016 00:33 IST

जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असतांनाही ती भरण्यावर राज्याच्या शिक्षण विभागाने मनाई केली आहे.

पायबंद : प्रक्रियेवर शिक्षण विभागाची टाच अमरावती : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असतांनाही ती भरण्यावर राज्याच्या शिक्षण विभागाने मनाई केली आहे. अशा सर्व रिक्त जागा या केवळ सीईटीने भरल्याचे सक्त आदेश जारी करण्यात आले आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याबाबत शिक्षक संघांकडून वारंवार मागणी केली जाते. अशा रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने प्रक्रिया ही सुरू केली होती. मात्र या प्रक्रियेला आता स्थिगिती देण्यात आली आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरल्यास राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मनाई केली आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत येण्याचा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची किंवा पदभरती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालयाने जारी केले आहे. शिक्षक संचालक एन. के. जरग यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना या बाबतचे पत्र पाठविले आहे. सर्व उपसंचालकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना याबाबत कळवावे, असे या पत्रात म्हटले आहे. राज्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांच्या जागा केवळ भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाव्यात, असे पत्रात नमून करण्यात आले आहेत. त्यामुळे सीसीईटीचा निकाल लागेस्तोवर खासगी शाळांमधील जागा आता भरल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)रिक्त पदांची माहिती मागविली जिल्ह्यासह राज्यात सर्व रिक्तपदांची माहिती गोळा करण्यात प्राथमिक शिक्षक संचालनालयाने सुरुवात केली आहे. विविध जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत. याचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात १ जानेवारी २०१६ पर्यंत शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत. याची विस्तृत माहिती शिक्षण संचालनालयाने मागविली आहे. या आधारे फक्त रिक्त पदांची माहिती एकत्रित होणार आहे. त्यानंतर पदे सीआईटीच्या माध्यमातून भरली जाणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.