शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टीटी ऐवजी टीडी इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:14 IST

धनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारी टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्याऐवजी आता धनुर्वात आणि घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे.

ठळक मुद्देशासकीय रुग्णालयात मिळणार मोफत : धनुर्वातासोबत घटसर्पाची लस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारी टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्याऐवजी आता धनुर्वात आणि घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे.गत काही वर्षांपासून १० आणि १६ वर्षे वयोगटात घटसर्पाचे (डिप्थेरिया) प्रमाण जास्त आढळून आल्याने आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. ही लस सर्व गरोदर मातांना तथा १० व १६ वर्षाच्या मुलांना सर्व शासकीय रुग्णालयात मोफत मिळणार आहे. या लसमध्ये धनुर्वात लसीचे प्रमाण पूर्वीसारखे जास्त असून, घटसर्पचे प्रमाण कमी असणार आहे.राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये धनुर्वात प्रतिबंधक म्हणजे टीटीची लस इंजेक्शनद्वारे दिली जाते. आतार्यत गर्भवती तथा १० व १६ वर्षाच्या मुलांना टीटी लस नियमित लसीकरणामध्ये दिली जायची. त्यानंतर टीटी ऐवजी टीडी दिली जाणार आहे तसेच नियमित लसीकरणामध्ये धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प हिपॅटायटीस आणि इन्फ्लूएंझा एच, इन्फ्लूएंझ बी या पाच आजारांवर एकत्रित लस म्हणजेच पेंटाव्हॅलेट लस यापूर्वी दिली जात आहे. तसेच गोवर-रूबेलाची एकत्रित लस सध्या दिली जात आहे.संयुक्त लस दिल्यामुळे वारंवार सुई टोचण्यापासून लहान मुलांची सुटका झाली आहे. दीड आणि पाच वर्षांच्या मुलांना डीपीटी ही लस ही दीड आणि साडेतीन महिने, दीड वर्ष, पाच वर्ष, साडेपाच वर्षाच्या मुलांना दिली जाते. त्यामुळे घटसर्पविरोधी लस या मुलांना मिळते.पाच ते १६ वर्षांपुढील मुलांमध्ये घटसर्प या आजाराचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे टीटी ऐवजी टीडी लस देण्याची सृूचना केंद्र शासनाने दिली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.डब्ल्यूएचओची सूचनाघटसर्पाची लस पाच वर्षापर्यंतच्या मुलांना सहज मिळते. मात्र, पाच ते १० वर्षे आणि १० ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये घटसर्प या आजाराचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने धनुर्वातासह टीटी आता घटसर्प डिप्थेरिया ही संयुक्त लस देण्याची सूचना केली. सध्या १० आणि १६ वर्षाच्या मुलांंना तथा गरोदर मातांना टीटी ऐवजी टीडी ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लशीतून दोन्ही आजारांना प्रतिबंध होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य