करवसुली पूर्ण; सेवा का अपूर्ण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:30+5:30

शहराची सुरुवात होणाऱ्या अर्जुननगर-रहाटगाव प्रभाग घ्या किंवा बडनेराच्या नवीवस्तीतील शेवटचा प्रभाग, या सर्व प्रभागांत स्वच्छतेबाबत नागरिकांच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये आता आरोग्य अन् स्वच्छता विभागून महापालिका प्रशासनाने स्वत:च्या पायावर कुºहाड मारून घेतली आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. समन्वय नाही. स्वच्छता कंत्राटदार कुणालाच जुमानत नाही. सर्वच प्रभागात आता बकाल अवस्था झालेली आहे.

 Tax collection completed; Incomplete service? | करवसुली पूर्ण; सेवा का अपूर्ण ?

करवसुली पूर्ण; सेवा का अपूर्ण ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दैनंदिन सफाईच्या अनुषंगाने महापालिकेत प्रभागनिहाय कंत्राट असले तरी यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे. अनेक प्रभागांत चार दिवसांआड कचरा संकलन होत आहे. त्यामुळे करवसुलीसाठी बडगा उगारत असताना सेवा का अपूर्ण दिली जात आहे, असा आठ लाख अमरावतीकरांचा सवाल आहे.
शहराची सुरुवात होणाऱ्या अर्जुननगर-रहाटगाव प्रभाग घ्या किंवा बडनेराच्या नवीवस्तीतील शेवटचा प्रभाग, या सर्व प्रभागांत स्वच्छतेबाबत नागरिकांच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये आता आरोग्य अन् स्वच्छता विभागून महापालिका प्रशासनाने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. समन्वय नाही. स्वच्छता कंत्राटदार कुणालाच जुमानत नाही. सर्वच प्रभागात आता बकाल अवस्था झालेली आहे. कंत्राटदारां-बाबत तक्रारीला केराची टोपली दाखविली जाते. यामुळे ते कुणालाच जुमानत नाहीत. कुठलाही प्रभाग घ्या, सर्वाधिक तक्रारी स्वच्छतेबाबत होतात अन् महिन्याकाठी कोट्यवधीची सर्वाधिक बिले या कंत्राटाची आहेत. महापालिकेचे अधिकारी अन् कर्मचारी कंत्राटदारांचे बटिक आहेत का, असा नागरिकांचा सवाल आहे.
अर्जुननगर प्रभागात चार दिवासांआड कचरा संकलन केले जाते. नाल्यांची सफाई नियमित होत नाही. कचरा संकलन करणाºया वाहनांसोबत मदतनीस राहत नाही. कित्येक महिने धूर फवारणी होत नाही. खुल्या प्लॉटमध्ये जंगल झाले. टक्केवारीत सर्वाधिक कराचा भरणा करणारा प्रभाग असताना आम्हाला सेवा का अपूर्ण, असा येथील नागरिकांचा सवाल आहे.
स्वच्छता कंत्राटदारविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यामागे नगरसेवकाचे काय गुपित आहे, असा सवाल येथील नागरिकांचा आहे. महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तदेखील या तक्रारी बेदखल का करतात, त्यांच्या अधिनस्थ असलेली यंत्रणा करते तरी काय, दैनंदिन हजेरीच्या वेळी उपस्थित राहणारे पदाधिकारी नंतर गपगार का राहतात, हा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.
प्रभागातील सर्व रस्ते, लहान-मोठ्या कच्च्या-पक्क््या नाल्या, सर्व्हिस गल्ली, सार्वजनिक शौचालये, मुताºया, कल्व्हर्ट रोड, क्रॉस ड्रेन साफ करणे, नालीवरील, रोड डिव्हायडरवरील गवत काढणे, फुटपाथवरील कचरा व घाण काढून कंटेनरमध्ये टाकणे, डास निर्मूलन मोहीम राबविणे, प्रभागात फवारणी धुवारणीची कामे अगत्याची आहेत. तथापि, कित्येक ठिकाणी या कामांना हातच लागलेला नसल्याचे वास्तव आहे.
राज्यात राहणीमानाबाबत ‘टॉप टेन’मध्ये गणले जाणारे अमरावती शहर स्वच्छता मानांकनात का माघारते, हे या बाबी स्पष्ट करीत आहेत.

दुर्लक्षित ठिकाणी ऑफिस
नागरिकांच्या तक्रारींसह कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटदारास प्रभागातील कार्यालय (ऑफिस) २४ तास उघडे ठेवावे लागते. त्यात संगणक, तीन कामगारांची व्यवस्था आणि टोल फ्री क्रमांक अत्यावश्यक आहे. प्रत्यक्षात हे कार्यालय अशा दुर्लक्षित भागात असते की, कुणाही नागरिकाला पत्ता सापडणार नाही. अशीच अवस्था बहुतांश प्रभागांमध्ये आहे. प्रतिदिन हजार रुपये दंडाची तरतूद असताना महापालिकेने एकदाही याप्रकरणी कारवार्ई केली नसल्याचे वास्तव आहे.

बायोमेट्रिक हजेरी का नाही?
स्वच्छतेसाठी कंत्राटदाराने ५५ कामगार कर्तव्यावर ठेवणे अनिवार्य आहे. किती ठिकाणी हे कामगार आहेत, यांच्या हजेरीच्या वेळी उपस्थित असणारे काही नगरसेवक याविषयीचा आवाज का उठवित नाहीत, या कामगारांची बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य असताना व करारनाम्यात तशी तरतूद असताना महापालिका प्रशासन त्यात सूट का देते, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्यावेळी असतात तरी कोठे आदी एक ना अनेक सवाल या निमित्ताने नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

दंडाची आकारणी कधी करणार?
प्रत्येक मिनी टिप्परमध्ये नोटबूक अनिवार्य आहे. ज्या भागात कचरा संकलन केले, त्या भागातील २५ ते ३० नागरिकांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. मात्र, कचरा संकलनासाठी वाहनच चौथ्या दिवशी येत असेल, तर दररोज स्वाक्षऱ्या येणार कोठून? याबाबत स्वच्छता विभाग कधी पाहणी तरी करतो काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नियमांची पूर्तता कधीच केली जात नसताना या कामांची कोटींची बिले निघतात तरी कशी, याची पदाधिकारी कधी विचारणा करणार आहेत काय, अशा नागरिकांचा सवाल आहे.

वाहनावरील मदतनीस गायब
वाहनाबाबतच्या अटी व शर्तीनुसार मिनी टिप्परद्वारे घराघरांतून दैनंदिन कचºयाचे संकलन करताना प्रत्येक वाहनात एक मदतनीस अत्यावश्यक आहे व त्याने ओला व सुका कचरा वेगवेगळा करून टाकावयास पाहिजे. प्रत्येक वाहनावरील चालक व मदतनीस यांच्याजवळ स्मार्ट फोन आवश्यक आहे. त्याने प्रत्येक घरातून कचरा गोळा करतानाचा जीपीएस फोटो घेणे महत्त्वाचे असताना कुठेही सफाई होताना दिसत नाही. त्यामुळे स्वच्छता विभाग करतो तरी काय, असा नागरिकांचा सवाल आहे.

Web Title:  Tax collection completed; Incomplete service?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर