शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये रेल्वेला टाटा सुमो धडकून भीषण अपघात, सात प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 19:26 IST

संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

अमरावती - संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मूर्तिजापूर ते अचलपूर अशी फेरी करणारी इंग्रजकालीन डब्यांची शकुंतला रेल्वे गाडी बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास परतीच्या प्रवासात दर्यापूरहून मूर्तिजापूरकडे धावत होती. गायवाडी येथील गेटसमोर अचानक एमएच ३० पी १३०२ क्रमांकाची टाटा सुमो रेल्वे गाडी आली. शकुंतलेने या वाहनाला तब्बल पाचशे मीटर ढकलत नेले. यानंतर ही रेल्वे गाडी थांबली. दर्यापूर तालुक्यातील येवदा येथून लग्न समारंभातून टाटा सुमोतील वºहाडी मंडळी कळाशीकडे येत होती. गायवाडी रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शकुंतलेच्या चालकांनी हॉर्न देऊनसुद्धा टाटा सुमोचालकाचे लक्ष नव्हते. त्यामुळे बसलेल्या धडकेत वाहनातील गोपाळराव देवतळे, ज्ञानेश्वरराव बरवट, राजू रामकृष्ण राणे, चंद्रशेखर गावंडे, राजू श्रीरंग राणे, चालक संतोष साबळे व समर्थ विकास राणे (सर्व रा. कळाशी) हे सात प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. साडेचार वाजता शकुंतला रेल्वे मूर्तिजापूरकडे रवाना झाली. सदर घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती