फोटो - गणेश वासनिक यांच्याकडे
क्रीडा क्षेत्राच्या विकासासोबत मिळणार स्वयंरोजगारासाठी सुविधा, रवि राणा यांची नावीन्यपूर्ण संकल्पना
अमरावती : आमदार रवि राणा यांच्या संकल्पनेतून अंजनगाव बारी येथे तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. बीओटी तत्त्वानुसार ३ कोटी ८९ लाख ६० लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या इमारतीचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते झाले. याशिवाय त्यांनी अत्याधुनिक व्यायामशाळेचे लोकार्पण केले.
कार्यक्रमाला सुनील राणा, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, पंचायत समिती सदस्य मीनल डकरे, सरपंच प्रकाश खंडार, पुंडलिकराव मुळे, उदखेडच्या सरपंच शैलजा खंडार, पारडीचे प्रवीण सोनोने, विकसक रवि गुल्हाने तसेच दिलीप टारपे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक जितू दुधाने यांनी केले. दिनेश टेकाम, मीनल डकरे, प्रकाश खंडार यांनी मनोगत व्यक्त केले.
गावातील बेरोजगार युवक-युवती, महिला बचत गट, फुटपाथवर व्यवसाय करणारे छोटे -मोठे व्यवसायिक, व्यापारी यांना कायमस्वरूपी रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी तालुका क्रीडा संकुलात ६० दुकानांचे व्यापारी संकुल उभारण्यात येत असल्याचे आ. रवि राणा यांनी सांगितले. याप्रसंगी विकसक रवि गुल्हाने, कृषिकेश गुल्हाने यांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमासाठी उमेश डकरे, सुनील निचत, प्रमोद निचत, अशोक कारमोरे, दिलीप डांगे, ज्ञानेश्वर मुळे, विजय पोकळे, सतीश तेटू, जितू भस्मे, मनोहर पिसे, दिनेश क्षीरसागर, अहमदभाई, जानराव खडसे, छत्रपती सैरिसे, तुळशीदास बारबुद्धे, चंदू खडसे, दुधे, विनोद येवतीकर, हर्षल रेवणे, नितीन म्हस्के, राहुल काळे, ललित पिवाल आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमोद निचत व आभार प्रदर्शन उमेश डकरे यांनी केले.