अमरावती : जलयुक्त शिवार अभियानात निवडण्यात आलेल्या ३२५ गावांत विविध जलसंधारण कामे मंजूर करण्यासाठी तत्काळ ग्रामसभा घेऊन अधिकाऱ्यांनी शिवार भेटी द्याव्यात. जलसंधारण कामाचे आराखडे तयार करुन प्रत्यक्ष कामांना तातडीने सुरुवात करावी. त्या गावात कोणत्याच योजनेतून निधी उपलब्ध नाही, अशा गावांतील कामे नरेगाच्या माध्यमातून सुरु करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या बैठकीत दिले. यावेळी विविध यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समाविष्ट गावातील कामांचा कृती आराखडा, कृती आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांसाठी गाव निहाय निधीची मागणी व आवर पडता, अभियानातून निवडलेल्या गावात सुरु असलेली कामे स्वरुप एकूण अंदाजित किंमत याचा आढावा घेतला. शिवाय महात्मा फुले जल व भूमी संधारण कामाअंतर्गत प्राप्त निधी झालेला खर्च शिल्लक निधी, यांत्रिकी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचे शेड्युल्ड खासगी यंत्र असणाऱ्या कंत्राटदारांची माहिती नरेगा अंतर्गत विशेषत: धारणी, चिखलदरा येथे त्या गावात मोठ्या प्रमाणावर गाव तलाव व दुरुस्ती गाव काढणे कामे सुरु आहेत. गावे जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट करणे. यासाठी गावनिहाय सुरु असलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. दरम्यान त्यांनी पाणी टंचाईच्या समस्येवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने नियोजनबध्द कृती आराखडे तयार करुन पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रत्येक विभागांनी गांभीर्याने व अभ्यासपूर्ण कृती करावी. विविध योजनांचा निधी एकत्रीत करुन नियोजित कामे पूर्ण करावीत यासाठी लोकसहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
जलयुक्त शिवार कामांसाठी तातडीने कारवाई करा
By admin | Updated: March 16, 2015 00:21 IST