अमरावती : चाचण्यांमध्ये पाॅझिटिव्हच्या टक्क्यांमध्ये कमी येत असताना कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूने डोके वर काढले आहे. रविवारी पुन्हा सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची एकूण संख्या ५९९ झालेली आहे. याशिवाय ३८३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४२,४९७ झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी २,७०३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात १४.१३ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आली. शनिवारीदेखील १५ टक्के असे प्रमाण होते. यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला असला तरी मृत्यू संख्येत होत असलेली वाढ मात्र, चिंताजनक आहे. जिल्ह्यात ३४४ दिवसांत ४२,४९७ पॉझिटिव्हची नोंद झाली. म्हणजेच रोज सरासरी १११ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली व फेब्रुवारी महिन्यात ब्लास्ट झाला. या २८ दिवसांत १७ हजारांपर्यंत कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्हा हादरला व जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले. त्यानंतर त्यामध्ये काहीअंशी शिथिलता देण्यात आलेली व याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहे. महापालिका क्षेत्रात दंडाच्या कारवाया नियमित होत आहे. त्यामुळे मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. याशिवाय मंगल कार्यालये, हॉटेल्स व होम आयसोलेटेड बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवर कारवाया सुरू आहे. याद्वारे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.
बॉक्स
कोरोनाचे सहा मृत्यू
०००
००००००००००
( तीन ओळी जागा सोडावी, माहिती यायची आहे.)