शहरं
Join us  
Trending Stories
1
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
2
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
3
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
4
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
5
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
6
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
7
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
8
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
9
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
10
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
11
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
12
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
13
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
14
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
15
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
16
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
17
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
18
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
19
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा

भाडेकरूने केला शैलजा निलंगेंचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:09 IST

एकट्या राहणाऱ्या घरमालकीणीची काळजी वाहण्याऐवजी भाडेकरूने तिच्या पैशांवर डोळा ठेवून नियोजनबद्ध खून केला. खुनानंतर त्याने पोलिसांपुढे वेगळीच कथा रचली. मात्र, एटीएमच्या सीसीटीव्हीने त्याचे बिंग फोडले. शैलजा निलंगे हत्याकांडात हा घटनाक्रम गुरुवारी रात्री पुढे आला.

ठळक मुद्देपाच हजारांसाठी आवळला गळा

४८ तासांत छडापाच हजारांसाठी आवळला गळालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकट्या राहणाऱ्या घरमालकीणीची काळजी वाहण्याऐवजी भाडेकरूने तिच्या पैशांवर डोळा ठेवून नियोजनबद्ध खून केला. खुनानंतर त्याने पोलिसांपुढे वेगळीच कथा रचली. मात्र, एटीएमच्या सीसीटीव्हीने त्याचे बिंग फोडले. शैलजा निलंगे हत्याकांडात हा घटनाक्रम गुरुवारी रात्री पुढे आला.आरोपी धीरज शिंदे (२३, मूळ रहिवासी आसेगाव पूर्णा) याने गुरुवारी रात्री उशिरा शैलजा निलंगे यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडून पोलिसांनी घटनाक्रम जाणून घेतला.पोलीस सूत्रानुसार, शहरातील जलारामनगरातील घरात शैलेजा निलंगे यांची उशीने तोंड दाबल्यानंतर गळा आवळून हत्या केल्याचे बुधवारी उघड झाले. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी तपास हाती घेतल्यानंतर अज्ञात परिचितावर संशयाची सुई रोखली होती. हत्येपूर्वी शैलजा निलंगे घरात परिचित व्यक्तीसोबत होत्या. परिचित व्यक्तीनेच त्यांची हत्या केल्याचा पोलिसांचा निष्कर्ष होता. त्यानुसार शैलजा निलंगे यांच्या घरी वास्तव्यास असलेला एकमेव भाडेकरू धीरज शिंदे याच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंदित केले. यादरम्यान धीरज हा दस्तुरनगर परिसरातील त्याच्या प्रेयसीकडे गेला होता. पोलिसांनी धीरजच्या या पे्रयसीलाही ताब्यात घेतले. तिचीही कसून चौकशी केली. त्याचवेळी पोलिसांनी शैलजा यांच्या बँक खात्याबाबत माहिती काढली. हत्येनंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी एटीएमच्या सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावेळी धीरज शिंदे हाच रुमाल बांधून पैसे काढत असल्याचे सीसीटीव्हीत निदर्शनास आले. त्याने वेगवेगळ्या एटीएममधून दहा-दहा हजारांची रोख विड्रॉल केली. त्यामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला होता. यामुळे पोलिसांनी धीरजच्या चौकशीचा वेग वाढविला. त्याचा दबाव सहन न झाल्याने धीरज फुटला आणि त्याने हत्येची कबुली दिली.सीपी, डीसीपींसमोर हत्येचे प्रात्यक्षिकगुन्हे शाखा व फ्रेजरपुरा पोलिसांनी हत्येचा उलगडा केल्यानंतर संबंधित माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना देण्यात आली. त्यांनी रात्री ९.३० वाजता फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून धीरज शिंदेची चौकशी केली. यावेळी त्याने हत्येचा सर्व घटनाक्रम विशद केला. मंगळवारी रात्री शैलजा यांचे जेवण झाल्यानंतर तो त्यांच्या खोलीत गेला. त्याने शैलजा यांना पाच हजारांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून त्याला नकार मिळाला. यामुळे खवळलेल्या धीरजने शैलजा यांना पलगांवर ढकलले आणि त्यानंतर उशीने तोंड दाबले आणि रुमालाच्या साहाय्याने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर रात्री उशिरा तो आपल्या खोलीत परतला. काही तासानंतर पुन्हा उठून त्याने चोरलेले एटीएम वापरून शैलजा निलंगे यांच्या खात्यातून रक्कम काढली.

टॅग्स :Murderखून