जुनी पेंशन केंव्हा : अनिश्चितता दूर करण्याची मागणीमोर्शी : खासगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आश्रमशाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व समस्या निवारणार्थ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर प्रांताध्यक्ष श्रावण बरडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलनानंतर एक लोटी निवेदन शिक्षण विभागाचे अधीक्षक देवेंद्र रोडे व पी. ए. नाणे यांना देण्यात आले.या निवेदनात २८ आॅगस्ट २०१५, ८ जानेवारी २०१६ व २७ मे २०१६ हे तिनही शासन निर्गमित करून नयाने सशक्त सर्व शिक्षकांना पुरक व अन्यायकारक नसलेला एकच निर्णय घ्यावा. सर्वच शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या अनुदानासाठी पात्र ठरविणे, ७ व्या वेतन आयोगाच्या संभाव्य वेतन शिफारशी केंद्राप्रमाणे राज्यातही लागू करण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात तरतूद करणे, शालेय संच मान्यतेच्या सर्व अनिश्चितता दूर करणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन नियमानुसार पडताळणी करून करण्यात यावे यासह विविध आश्रमशाळांच्या अनेक मागण्यांचे निवेदन देवेंद्र रोडे यांना सादर करणयात आले. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. धरणे आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांताध्यक्ष एस. जी. बरडे, जिल्हा कार्यवाह जयंत सराटकर, शहर अध्यक्ष अतुल देशमुख, शहर कार्यवाह अरविंद चौधरी यांचेसह विमाशिचे पदाधिकारी तसेच राजेंद्र शेंडे, डी. जी. चवरे, ए. बी. घोरपडे, डी. बी. गोळे, अविनाश जैस्वाल, आर. जी. कोटांगळे, दिलीप देशमुख, अ. दि. आवारे, पु. ना. जिचकार, महेश निर्मळ, पी. एस. तिडके, बाळासाहेब शिरभाते, आर. एम. धनैय्या, मायावती गोसावी, मळसने, विजयराव वडतकर, अशोक गुबरे, गणेश राठोड, पी. एम. चुळे, जे. जे. तायडे, एस. पी. कडू, आर. जी. धुर्वे, एच.एस. धोंडे, मंगेश गायकवाड, राजेंद्र ठाकरे, एस. बी. धोटे, डी. जे. हासवानी यांच्यासह तालुक्यातील असंख्य शिक्षक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
समस्या निवारणार्थ शिक्षकांचे धरणे
By admin | Updated: July 9, 2016 00:08 IST