शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात प्रतीकात्मक जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:41 IST

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात मंगळवारी प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले. संपूर्ण तालुका कोरड्या दुष्काळात होरपळला असताना, भाजपक्षाने पाण्यासाठी राजकारण चालविले असल्याचा आरोप करण्यात आला.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन : अप्पर वर्धाचे पाणी सोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात मंगळवारी प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले. संपूर्ण तालुका कोरड्या दुष्काळात होरपळला असताना, भाजपक्षाने पाण्यासाठी राजकारण चालविले असल्याचा आरोप करण्यात आला. मोर्शीचे आमदार अनिल बोंडे यांचा निषेध करून अप्पर वर्धा नदीचे पाणी तालुक्यात सोडण्याची आग्रही मागणी करण्यात आली.अप्पर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीपात्रात सोडून ते तिवसा तालुक्याला देण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली होती. मात्र त्यात राजकारण शिरल्याने सोमवारी अवघ्या दोन तासांत धरणाचे दरवाजे बंद करून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी तालुक्यातील खडका फाटा स्थित वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले. वर्धा नदीला पाणी सोडण्यात यावे, अन्यथा हजारो नागरिक या नदीत सामूहिक आत्महत्या करतील, असा इशारा नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप राऊत, शहराध्यक्ष भूषण यावले, दिलीप भुयार, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रीतेश पांडव, बबलू मक्रमपुरे, नरेंद्र विघ्ने, अतुल देशमुख, दिवाकर भुरभुरे, किसन मुंदाने, कुंदन कंळबे, विजय करडे, सचिन राऊत, सचिन अढाऊ, उमेश राऊत आदी यावेळी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस